Breaking

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

महिलेशी गैर वर्तन आणि धमकी दिल्या प्रकरणी एका वर गुन्हा दाखल


महिलेशी गैर वर्तन आणि धमकी दिल्या प्रकरणी एका वर गुन्हा दाखल


महाड : प्रतिनिधी AJ 24 Taas News Maharastra

महाड तालुक्यातील वहूर गावा मध्ये एका महिलेच्या शेजाऱ्यांनी अश्लील चाळे करत शाररिक संबंधा ची मागणी करत ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .ही घटना एप्रिल २०२१ मध्ये घडली असून या संबंधित महाड शहर पोलीस ठाण्यात १४ /२/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
वहूर बौद्धवाडी येथी रहिवाशी चेतन अशोक खैरे यांनी एप्रिल २०२१ मध्ये आपल्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या घरी जाऊन पिण्याच्या पाण्याची आणि मॅचेस बॉक्स ची मागणी करत घरात कोण्ही नसल्याचा फायदा घेत त्या महिलेला मिठी मारत अंगा वर ओढत मनात लज्जास्पद उत्पन्न होईल असे वर्तन केले . या बाबत कोणाला ही काय सांगितलेस तर तुझ्या मुलांना आणि नवऱ्या ला गायब करण्याची धमकी देत वारंवार शाररिक संबंधांसाठी व्हाट्सअप वर मेसेज केले .या संदर्भात महिलेने आपल्या नातेवाईकांजवल विचार करून अखेर चेतन खैरे याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली .आरोपी विरोधात भादवी कलम ३५४ ,३५४(अ)(२)५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा