*तुळजापूर नगरपरिषद येथे, मा, आमदार राणाजगजीतसिंह पाटील साहेब, यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबार संपन्न*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर तालुक्याचे आमदर राणाजगितसिंहजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये नगर परिषद तुळजापूर येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. तत्तपुर्वी संत सेवालाल यांच्या जयंती निमीत्त प्रतिमेचे पुजन करण्यात आले तुळजापूर शहर तसेच तालुक्यातील नागरीक सदरील जनता दरबार मध्ये अडीअडचणी घेऊन आले होते. त्यातील महत्वपुर्ण विषय म्हणजे शहरातील पुजारी बांधव,पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके तथा महंत मावजीनाथ महाराज यांनी तुळजा भवानी मंदीराच्या माध्य मातुन होणार्या दर्शन मंडप, तसेच शहरातील पार्कींग बाबतही भुमीका सांगितली त्या मध्ये शहरात समांतर पार्कींग व्हावी तसेच शुक्रवार पेठ मध्ये मंदीरचे फ्रि पास काउंटर चालु क़रावे तसेच मंदीर परीसरातील शुक्रवार पेठ कडील रोडच्या पायर्या काढुन तेथे रोड करावे आदी मागनीचे निवेदन आमदार राणादादां कडे दिले तसेच शहर बाहेरील भागातील पाणी पाईप लाईन बाबतती निवेदन देण्यात आले गोलाई ते हेलीपँड सर्हीस रोडची या वेळी मागनी करण्यात आली. सदरील जनता दरबारास मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी,युवा नेते विनोद गंगणे,आंनंद कंदले,बापुसाहेब कणे,पंडीतराव जगदाळे,किशोर साठे,माऊली भोसले तसेच मुख्याधिकारी येलगंटेसाहेब,तहसिलदार तांदळेसाहेब,मंदीर तहसिलदार कोल्हे मँडम तसेच शहरा संबंधित सर्वच आँफीसचे अधिकारी नगर परिषदचे सबंधीत सर्व अधिकारी उपस्थित होते. सदरील जनता दरबार मध्ये ऐंकुण १०२ विषया बाबतचे निवेद प्राप्त झाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा