*शैक्षणिक कार्य समाजाभिमुख असणे काळाची गरज* - *प्राचार्या शुभांगीताई गावडे*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर,दि.१०, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे हितगुज सोहळा आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या संस्था सचिवा प्राचार्या शुभांगीताई गावडे यांनी वरील प्रतिपादन केले,
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्या पुढे म्हणाल्या की,आज सर्वांनी नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करुन त्याचा उपयोग समाजासाठी करणे आवश्यक आहे, गुरुदेव कार्यकर्त्यांच्या समर्पण भावनेमुळेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आज समर्थ आहे,व्यक्तिने बाह्य सौंदर्याला महत्त्व न देता आंतरिक सौंदर्य वाढीस लावणे गरजेचे आहे, कोणत्याही मोठ्या उपक्रमाची यशस्वीता ही सामुहिक प्रयत्नांनी शक्य आहे असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तूभ गावडे हे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, वरिष्ठ महाविद्यालयाचे नॅक परिपूर्ण करत असताना आपण तुलनात्मक अभ्यास करणे गरजेचे आहे, आपण सामोरे आलेल्या समस्यांना अभ्यासपूर्ण उत्तर तयार करणे आवश्यक आहे , शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी दगडातून मूर्ती घडविण्याचे संस्कार समाजाला दिले आहेत,आपली ध्येय मोठी असावीत, महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्याचा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.यावेळी महाविद्यालयीन विकास समितीचे नवनियुक्त सदस्य सज्जन साळुंके यांचा सत्कार संस्था सचिवा प्राचार्या शुभांगीताई गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.सदर प्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभागप्रमुख, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख यांनी ही उपस्थितांना मार्गदर्शन केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयच्या नॅक तयारी बाबतचा आढावा घेतला. तर सूत्रसंचालन प्रा जे बी क्षीरसागर यांनी केले,तर कार्यक्रमासाठी पुजारी मंडळाचे अध्यक्ष बिपिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती, शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रो.मेजर डॉ डोके यांनी मानले,या कार्यक्रमाचे औचित्य साधुन यावेळी मुलिंच्या आरोग्य विषयक सुविधेस अनुसरुन प्राचार्या शुभांगीताई गावडे यांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकिन वेनडीग मशीनचे उद्घाटन संपन्न करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा