*तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना सुरू करून यशस्वी गाळप केल्याबद्दल मा. सुनील मालक चव्हाण यांचा 20 फूट हार घालून सत्कार*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
नळदुर्ग तुळजापूर,
मागील पंधरा वर्षांपासून बंद असलेला तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्याची अस्मिता होता .आणि या कारखान्यांच्या बंद अवस्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले होते व शेतकऱ्यांनी ऊस पिकाकडे पाठ फिरवत ऊस शेती रामराम ठोकला. हे शेतकऱ्यांचे हाल माजी मंत्री मा.मधुकररावजी चव्हाण साहेब यांचे चिरंजीव सुनील चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव शेतकऱ्यांमध्ये असलेली नैराश्य दूर करण्यासाठी तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पुन्हा सुरू केला व उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँके वरती बिनविरोध निवड झाल्याबद्दल *एम.व्ही.टेक इंजिनिअरिंग वर्क राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काटी Z. P गट* यांच्या वतीने 20 फूट हार घालून सुनील मालक चव्हाण यांचा भव्य सत्कार तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्यात करण्यात आला. या वेळी एम.व्ही.टेक इंजिनिअरिंग वर्क चे संस्थापक तथा युवा नेते राष्ट्रवादी मोहनजी जाधव ,जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग उस्मानाबाद प्रा.जुबेर शेख ,सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुजित भैय्या हंगरकर, माजी सरपंच शामराव आगलावे,माजी .ग्रा. सदस्य करीम दादा बेग,चंद्रकांत काटे,भैरीनाथ काळे,भैरू कदम,महादेव जाधव,हमीद भाई शेख ,आणासाहेब आलुरे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माननीय सुनील मालक चव्हाण यांच्याशी विविध विषयावरती चर्चा झाली. त्यावेळी सुनील मालक चव्हाण यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत हा कारखाना सुरू ठेवू असे अभिवचन तालुक्यातील शेतकरी बांधवांना दिले. व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन घ्यावे असे आव्हान सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना करत रजा घेतली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा