नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृह पूर्वीप्रमाणे तात्काळ सुरु करा-मनसे
---------------------
सार्वजनिक बांधकाम विभागाकड़े मनसेची निवेदनाद्वारे मागनी
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
नळदुर्ग-शहराला दोन राष्ट्रीय महामार्ग लाभलेले शहर असून,येथील शासकीय विश्रामगृह हे मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ लगत असून,गेल्या एक-दोन वर्षापासून धूळखात पडले आहे,विश्रामगृहात काटेरी झाडे झुडपे वाढत आहेत,येथील इमारतीची दुरावस्था होत आहे,अस्वच्छ परिसर व देखभाल होत नसल्याने विश्रामगृह इतिहास जमा होईल का अशी भीती वाटत आहे?शहरात ऐतिहासिक किल्ला,श्री खंडोबा देवस्थान, श्री क्षेत्र रामतीर्थ देवस्थान, नानिमाँ दर्गाह,आदि प्रसिद्ध देवस्थाने व पर्यटन स्थळे आहेत
,या शिवाय अणदूर,तूळजापुर, अक्कलकोट येथे दर्शनासाठी जाणारे व लांब पल्याच्या प्रवासातुन आलेले भाविक यांना हेच एक ठिकाण विश्रांतीसाठी आहे,त्यामुळे शहरात दाखल होणारे भाविक व पर्यटक यांना हे विश्रामगृह सोयीचे असून ते सद्या बंद अवस्थेत असल्याने त्यांची प्रचंड नाराजी होत आहे,हे विश्रामगृह पूर्वीप्रमाणे सुरु करून याची दुरुस्ती व देखभाल करून भाविक व पर्यटकासाठी सोय करावी,अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य.अभियंता श्री.खंडागळे यांच्याकड़े निवेदनाद्वारे मागणी केली आहे,निवेदनावर मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के यांच्या स्वाक्षरी आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा