1 ते 10 फेब्रुवारी चे प्रतिटन 2100 प्रमाणे ऊस बिल ऊस पुरवठादारांच्याबँक खात्यात वर्ग
- आ.बबनराव शिंदे
दहा दिवसाला ऊस बील देणारा राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना...
राज्य साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या आव्हानास आ. बबनदादां शिंदे यांचे प्राधान्य
बेंबळे।प्रतिनिधी। AJ 24 Taas News Maharastra Network-प्रतिनिधी- मुकुंद रामदासी
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2021-22 गळीत हंगामामध्ये 1 ते 10 फेब्रुवारी 2022 या 10 दिवसाचे कालावधीचे ॲडव्हान्स ऊस बील ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे युनिट नं.1 व 2 चा सन 2021-22 चा गळीत हंगाम सुरू असून आजअखेर युनिट नं.1 कडे 14 लाख 90 हजार 703 मे.टन ऊस गाळप होवून 13 लाख 01 हजार 200 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. युनिट नं.1 कडील सरासरी साखर उतारा 11.25 टक्के (बी हेव्ही व सिरपसह) आहे. युनिट नं.1 पिंपळनेर साखर उता-यामध्ये जिल्ह्यात आघाडीवर आहे. तसेच युनिट नं. 2 कडे 4 लाख 57 हजार 16 मे.टन ऊस गाळप होवून 4 लाख 40 हजार 500 क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झालेले आहे. युनिट नं.2 करकंब सरासरी साखर उतारा 11.13 टक्के (बी हेव्ही सह) आहे.
या हंगामात दोन्ही युनिटकडे 10 फेब्रुवारी,2022 अखेर गाळपास आलेल्या सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांना प्रति मे.टन रू.2100/-प्रमाणे ॲडव्हान्स पेमेंट ऊस पुरवठादारांना अदा करण्यात आले आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी गाळपास आलेल्या ऊसाचे ॲडव्हान्स पेमेंटचा कालावधी पंधरवड्या ऐवजी 10 दिवस करणेबाबत केलेल्या आवाहनानुसार आपले कारखान्याने 1 ते 10 फेब्रुवारी 2022 या 10 दिवसाचे कालावधीचे ऊस बील ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. या गळीत हंगामामध्ये यापुढे दोन्ही युनिटकडे गाळपास येणा-या ऊसाचे ऊस बील पेमेंट करणेचा कालावधी 10 दिवसांचा करणेत आला असल्याची माहीती आ.शिंदे यांनी दिली.
सन 2021-22 गळीत हंगामासाठी युनिट नं.1 व 2 कडे सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांचे नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप मार्च,2022 अखेर पर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले असून सभासद, ऊस पुरवठादार शेतक-यांनी आर्थिक तोशीष सहन करून ऊसाची इतरत्र विल्हेवाट लावू नये. कारखान्याकडे नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप होणार आहे. तरी सर्व सभासद,ऊस पुरवठादार यांनी संपुर्ण ऊस कारखान्याकडे गाळपास देवून सहकार्य करावे असे आवाहन संस्थापक-चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा