Breaking

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

तुळजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सागर कदम यांना समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित*



*तुळजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सागर कदम यांना समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

तुळजापूर येथिल सामाजिक कार्यकर्ते सागर कदम यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेवून सन २०२१-२२ या वर्षीचा समाजसेवा ' गौरव पुरस्कार ' देवून
युवा भिमसेना संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सान्मानित करण्यात आले.
त्यांनी लॉकडाऊन काळात किराना कीट, मास्क, सेनिटाइझर, अर्सेनिक गोळ्या,कोविड रूग्णांची फळे, नाष्टाची सोय, भिमनगर येथिल मुलांना क्रीक्रेट साहित्य, मोफत चित्रपट, भिमनगर, सिध्दार्थनगर, आराधवाडी येथे स्वखर्चातून वाचनालय, जिमचे साहीत्य, वृक्षारोपन, डॉ. बाबासाहेब जयंतीनिमीत्त रक्तदान शिबिर, अन्नदान, शहरातील शासकिय कार्यालयाला संविधान उद्देशिका भेट तसेच त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमाची दखल घेवून युवा भिमसेना संस्थापक अध्यक्ष पंकज काटे यांच्या हस्ते पूरस्कार देण्यात आला.
यावेळी युवा भिमसेनेचे संस्थापक सचिव राहुल, कार्याध्यक्ष समाधान शितोळे, मराठवाडा अध्यक्ष अमोल जागते, लातूर जिल्हाध्यक्ष महेबूब सय्यद, पंकज गायकवाड, स्वप्निल कदम, मोहीत डोळसे, प्रशांत गाडे तसेच युवा भिमसेना कार्यकर्ते उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा