खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांवार वनविभागाची कारवाई
• खवल्या मांजरासह पाच आरोपी ताब्यात
• भोर आणि महाड वनविभागाची सयुंक्त कारवाई
महाड – प्रतिनिधी AJ 24 Taas News
माणगाव तालुक्यातील टोळ खु. याठिकाणी खवल्या मांजराची विक्री होणार असल्याचे वन विभागाला समजताच वन विभागाने टाकलेल्या धाडीत खवल्या मांजराची विक्री करणाऱ्या पाच जणांना वन विभागाने ताब्यात घेतले आहे. महाड वन विभागाअंतर्गत खवल्या मांजराची तस्करी हा एक मोठा गहन प्रश्न बनला आहे. गेली दोन वर्षातील हि तिसरी कारवाई आहे.
भोर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस.मिसाळ यांना वन्य प्राण्यांचा तस्करी होत असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरंधा घाट येथे गस्त घातली. मात्र संबंधित संशयित व्यक्तीने महाड जवळील टोळ खु. याठिकाणी खवल्या मांजराची विक्री होणार असल्याची माहिती प्राप्त होताच महाड वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश साहू यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून भोर आणि महाडच्या वनविभागाकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली. यावेळी गुन्ह्यात वापण्यात आलेल्या तीन दुचाकीही जप्त करण्यात आल्या. वन विभागाने टाकलेल्या धाडीत सुनील भाऊ वाघमारे रा भेलोशी - महाड, सतीश कोंडीराम साळुंखे कुंभेशिवथर – महाड, सुरज संतोष ढाणे निनामपाडळी - सातारा, देविदास गणपत सुतार टोळ खु माणगाव, शुभम प्रशांत ढाणे निनामपाडळी – सातारा, यांच्यासह त्यांच्या ताब्यातील एम.एच.११ सी.एफ. ६८०४, एम.एच.१२ ए जी २१३१, एम.एच. ०६ बी. वाय. ६२९० या दुचाकी, रानडुकराचा सुळा, संशयित पावडर असा माल ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी वन विभागाने वन्यजीव सरंक्षण अधिनियम १९७२ कलम ९, ३९ (अ), ३९ (२) (३), ४४ (१), (४), ५१ तसेच मुंबई वन्य जीव सरंक्षण अधिनियम १९५१ चे कलम १ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दिनांक १३ जानेवारी पर्यंत सर्व आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एस.एस.मिसाळ - भोर वनपरिक्षेत्र अधिकारी, महाड वन क्षेत्र अधिकारी राकेश साहू, संदीप परदेशी वनरक्षक दहीवड, रोहिदास पाटील वनरक्षक महाड, समीर जाधव वनरक्षक मोहोत, यांचा समावेश होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा