भाजपच्या नगरसेवकाला निवडून द्या... येणाऱ्या वर्षभरात सर्व समस्या सोडवतो, आ.विजयकुमार देशमुख यांनी दिली ग्वाही
सोलापूर - प्रभाग ५ अ शिवाजी नगर, पद्मावती नगर येथे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या स्थानिक विकास निधीतून ड्रेनेज लाईन टाकण्याचे कामाचे उद्घाटन आ.विजयकुमार देशमुख, नगरसेविका स्वाती आवळे व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिवाजी नगर हा भाग मोठा वाढलेला आहे. ड्रेनेज, पाणी, रस्ता, व लाईटचे काम काही भागातील पूर्ण झालेले आहे राहिलेले काम आम्ही सुरू करत आहोत येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकाला निवडून द्यावे जेणेकरून आपल्या भागाच्या विकासाला गती मिळेल व पुढील एक वर्षांमध्ये शिवाजी नगर भागातील सर्व समस्या सोडवतो अशी ग्वाही माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी बोलताना दिली.
शिवाजी नगर भागातील विकास करण्यासाठी आ.विजयकुमार देशमुख यांनी करोडोंचा निधी दिलेला आहे. यापूर्वी पाण्याची पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले आहे. यानंतर रस्ता, लाईटची सोया सुद्धा करणार आहे. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था येऊन ठेपलेल्या आहेत गेली साडे चार वर्षे काही नगरसेवक बाळे परिसरात फिरकले सुद्धा नाही. भारतीय जनता पार्टीच्या वतीने गेली साडे चार वर्षांमध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे व यापूढे ही करू आपल्या मदतीला धावून येणाऱ्या नगरसेवकाला निवडणून द्यावेत असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजभाऊ आलूरे यांनी बोलताना केले.
पद्मावती नगर येथे ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. याभागातील रस्त्याची समस्या सोडवावी व लाईट रस्त्याचे मधोमध असल्यावणे अपघात होत आहेत त्यामुळे लाईटचे पोल रस्त्याच्या बाजूला बसवण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी बोलताना केली. वेळोवेळी नगरसेविका स्वाती आवळे, सामाजिक कार्यकर्ते राजभाऊ आलूरे, समाधान आवळे, विनय ढेपे, यांचे सहकार्य मिळत असल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, राजाभाऊ आलुरे, विनयजी ढेपे, शिरीष सुरवसे, नगरसेवक नागेश भोगडे, आध्यत्मिक आघाडीचे अध्यक्ष मनोज हिरेहब्बू, अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस श्रीकांत रणदिवे, नामदेव भोसले, अमोल झाडगे, गोपीनाथ दळवे, अमोल झाडगे, सुहास माने, गणेश काळे झाडे सर स्मिता शिंदे ,काटकर ताई तसेच त्या गुलमोहर सोसायटी मधील अध्यक्ष डॉ प्रदीप चवरे ,सचिव श्री उमेश पवार श्रीकांत यादव ,मल्लू कोंडगुळे ,नितीन मुंडफने ,शिरीष बंडगर ,शंकर शिंगडगावकर,पिंटू गव्हाणे ,दिलीप वसेकर, धनंजय जाधव डॉ सचिन कुलकर्णी इ.परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा