Breaking

रविवार, ९ जानेवारी, २०२२

श्रीगोंदा तालुक्यात ऑनलाइन व ऑफलाईन मटका,सोरट सह अवैध्य धंधे जोमात प्रशासन कोमात.....



श्रीगोंदा तालुक्यात ऑनलाइन व ऑफलाईन मटका,सोरट सह अवैध्य धंधे जोमात प्रशासन कोमात.....


श्रीगोंदा-नितीन रोही,

तालुक्यातील मोठ मोठ्या गावांत चालतोय मटका,सोरट त्याच प्रमाणे दारू, वाळू, मुरूम,यांसह अनेक ठिकाणी अवैध धंदे बऱ्याच प्रमाणावर श्रीगोंदा तालुक्यात चालू आहे, पण पोलीस व महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.
अवैधपणे मटका आणि सोरट चा व्यवसाय सध्या तेजीत असून येथील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकां मध्ये बोलले जात आहे. 

 तालुक्यात व शहरात असणाऱ्या काही खोल्यांमध्ये अवैध व बेकायदेशीर मटका आणि सोरटचा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असतो. या ठिकाणी अनेक गरजू आणि गरीब लोकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुबाडणूक सुरू असते.

या मध्ये प्रत्येक गावातील आठवडे बाजारात येणारे खरीददार आणि विक्रेतेची कामगारांची रेलचेल येथे पहायला मिळते. या जुगारीच्या व्यसनामुळे अनेकांचे प्रपंच (संसार) उध्वस्त होत असून जुगार आणि व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांकडून रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना मुलींना त्यांचा त्रास सहन करावा लागतोय,तरी सुद्धा श्रीगोंदा, बेलवंडी पोलीसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे
 दोन्ही पोलीस ठाण्यातील पोलीसांनी या जुगार अड्ड्यावर त्वरित कारवाई करावी अन्यथा काही नागरिक जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा