Breaking

शनिवार, ८ जानेवारी, २०२२

राजेंद्र गुंड यांनी अल्पावधीत पत्रकारितेच्या क्षेत्रात नावलौकिक कमावला - उपाध्यक्ष रामचंद्र भांगेपत्रकार दिनानिमित्त विविध ठिकाणी त्यांचा यथोचित सत्कार



राजेंद्र गुंड यांनी अल्पावधीत पत्रकारितेच्या क्षेत्रात नावलौकिक कमावला - उपाध्यक्ष रामचंद्र भांगे


पत्रकार दिनानिमित्त विविध ठिकाणी त्यांचा यथोचित सत्कार 

माढा / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील पत्रकार तथा आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी अल्पावधीत पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध सामाजिक,सांस्कृतिक शैक्षणिक,धार्मिक,व्यावसायिक,कृषी, आरोग्य,राजकीय,औद्योगिक आदीं विषयांवर वस्तुनिष्ठ व सर्वसमावेशक पद्धतीने उत्कृष्टरित्या लेखन केल्यामुळे माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात नावलौकिक कमावला असून वेगळा ठसा निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र भांगे यांनी काढले आहेत.

ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार राजेंद्र गुंड यांचा रणजितसिंह (भैय्या) शिंदे मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्काराच्या वेळी बोलत होते.

पुढे बोलताना रामचंद्र भांगे म्हणाले की,पत्रकार राजेंद्र गुंड यांनी मानेगाव परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या वेळोवेळी प्रभावीपणे मांडल्या आहेत.या भागातील रस्त्यांची समस्या,आरोग्यविषयक प्रश्न व समस्या,समाजातील सुखदुःखाच्या घटना,शिक्षण क्षेत्रातील व विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बातम्या,राजकीय उलाढाली व निवडणूक निकाल,विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम आदी बाबींना लेखणीच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली आहे त्यामुळे अनेक प्रश्न व समस्या मार्गी लागल्या आहेत याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

माढा पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा यांच्या हस्ते पत्रकार राजेंद्र गुंड सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,रमेश बरकडे, सुधीर गुंड,दत्तात्रय काशीद उपस्थित होते.पत्रकार दिनाचे औचित्य साधून माढेश्वरी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत, गटविकासाधिकारी अधिकारी डॉ. संताजी पाटील,गटशिक्षणाधिकारी मारुती फडके,प्राचार्य महेंद्र कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा,पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उबाळे,डॉ.मोहन शेगर,डॉ.किशोर गव्हाणे,केंद्रप्रमुख रोहिदास कापसे,मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण,चेअरमन अनिलकुमार अनभुले,माजी सरपंच बालाजी गव्हाणे,अनिलकुमार बरकडे, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मोरे,सुनील शेंडगे,सौदागर गव्हाणे,नेताजी उबाळे,सतीश गुंड,कैलास सस्ते, सोमनाथ खरात,सज्जन मुळे,भिवाजी जाधव,दयानंद शेंडगे,सागर मोरे, कैलास खैरे,शुभम सस्ते,दिनकर कदम,विकास खैरे,अशोक कदम यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळी- पत्रकार दिनानिमित्त राजेंद्र गुंड सर यांचा विविध ठिकाणी सत्कार करताना मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा