टाकळेश्वर सेवा सोसायटी अध्यक्षपदी- सौ सारिका विजयकुमार कानगुडे_
श्रीगोंदा-नितीन रोही
तालुक्यातील प्रथमच सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दोन्ही महिलांची निवड करण्यात आली टाकळी लोणार येथील टाकळेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सौ सारिका विजयकुमार कानगुडे व उपाध्यक्षपदी सौ सुरेखा सुधीर आंधळे यांची बिनविरोध निवड झाली या संस्थेवर राष्ट्रवादीचे जिल्हा बँक संचालक व माजी आमदार राहुल दादा जगताप पाटील यांचे वर्चस्व आहे
टाकळेश्वर सोसायटी च्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच संस्थापक विजयकुमार बापूराव कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध झाली होती गुरुवारी पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळ सभा झाली त्यावेळी अध्यक्षपदासाठी सौ सारिका विजयकुमार कानगुडे यांच्या नावाची सूचना फिरोज गुलाब मालजप्ते यांनी मांडली त्याला धनराज गुलाब कानगुडे यांनी अनुमोदन दिले उपाध्यक्षपदासाठी सौ सुरेखा सुधीर आंधळे यांच्या नावाची सूचना विजयकुमार बापूराव कानगुडे यांनी मांडली त्याला संतोष झुंबर बुधवंत यांनी अनुमोदन दिले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लेखापरीक्षक सहकारी संस्था सुनील सेलुकर यांनी काम पाहिले त्यांना संस्थेचे सचिव अनिल जगदाळे यांनी मदत केली यावेळी संस्थेचे संस्थापक विजयकुमार बापूराव कानगुडे संचालक धनराज गुलाब कानगुडे जयश्री सूर्यभान कानगुडे शरद बाळासाहेब गलांडे संतोष झुंबर बुधवंत धनेश्वर निवृत्ती मते फिरोज गुलाब मालजप्ते हनुमंत खंडू घोडके संगीता देविदास रोड दत्तात्रेय दगडू दरवडे नितीन बाळासाहेब कोपनर तसेच युवा नेते दिपक नवनाथ कानगुडे सुधीर सुदाम आंधळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा