Breaking

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

खामसवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेत अनुभव कथन कार्यक्रम संपन्न*




*खामसवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेत अनुभव कथन कार्यक्रम संपन्न*


 खामसवाडी दि.१२,कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे दि.११डिसेंबर रोजी मा.विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत एकुण पाच उपकरणापैकी 'अनुभव कथन' उपक्रमांतर्गत सहभाग नोंदविला या अनुभव कथन उपक्रमा मध्ये  विद्यार्थ्यांना खामसवाडी येथील आधुनिक शेतकरी तथा पत्रकार गोपाळ शेळके यांनी 'राजमाची' या कमी कालावधीत घेता येनार्या पिकाची आधुनिक पद्धतीने पेरणी करणे या बाबत मार्गदर्शन केले.सदरील पीक हे फक्त ७५ दिवसात काढणीस येते, या पिकास फवारणी केव्हा आणी कशी करावी या बद्दल व्यवस्थित माहीती विद्यार्थ्यांस दिली.उत्कृष्ट पद्धतीने व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास निश्चितच शेती फायद्याची ठरते असे मत शेतकरी गोपाळ शेळके यांनी व्यक्त केले.
           या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक पिकांची माहिती देवुन शेतीला पूरक व्यवसाय कोणते आहेत यासाठी सविस्तर माहीती देण्यात आली.
          या उपक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक दत्तात्रय रसाळ यांनी केले तर सूत्रसंचालन डाॅ.आशोक शिंपले यांनी तर आभार प्रदर्शन राजेश सोनवळकर यांनी मानले. या वेळी बाळासाहेब देशमाने, पर्यवेक्षक तुकाराम मुळे, गोकुळदास गोरे,राठोड,नेताजी वाघ, शिवाजी कोकाटे,सुधाकर सुरवसे,तुकाराम सुरवशे, बाळासाहेब वाघमारे ,सुनिता लिंबोरे,सुदर्शनी कदम,अर्चना हेंगणे, विलास भंडारे, यांच्या सह विद्यार्थी,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा