*तुळजापूर येथे ४२ दिवसानंतर लालपरी धावली,तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विनंतीस मान,*
आज दिनांक,१२ डिसेंबर रोजी कृषिरत्न शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मागील ४२ दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पूर्णविराम देण्यासाठी, तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चालू असलेल्या संपास विनंती करून विद्यार्थी, महिला, वृद्ध ,यांचे होत असलेले हाल लक्षात घेता सर्व पदाधिकाऱ्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्याशी संपर्क साधून आपला संप मागे घेण्याची विनंती केली, व त्या विनंतीस मान देऊन कर्मचाऱ्यांनी संप आगार प्रमुखांनी संप मागे घेतला, त्याबद्दल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा