Breaking

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

अबॅकस मुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ - प्रिन्सिपल रेखा गडेकर


अबॅकस मुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ  - प्रिन्सिपल रेखा गडेकर


मुलांची एकाग्रता वाढण्यास होती मदत

टेंभुर्णी प्रतिनिधी/             अबॅकस ही एक वेदिक मॅथ्स गणितीय पद्धत आहे.या पद्धतीमुळे मुलांच्या बौद्धिक, शारीरिक,मानसिक व अभ्यासातील एकाग्रता वाढण्यास मदत होते.त्यामुळे सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना त्यांच्या मेंदूला चालना देण्यासाठी अबॅकस ही एक गणितीय पद्धत अतिशय उपयोगी ठरते असे मत ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल रेखा गाडेकर यांनी पालक सभेच्या वेळी व्यक्त केले.

                कारण कोरोनाच्या महामारीमध्ये सलग दोन वर्ष मुलांचा अभ्यासाकडील कल हा फार कमी होऊन ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल कडे वळलेला दिसतो. त्यामुळे मुलांमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांच्या मेंदूवर दुष्परिणाम होण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे.आता सर्व शाळा व्यवस्थित सुरू झाल्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे व अद्वितीय अशा अबॅकसकडे जास्तीत जास्त लक्ष घालावे.अबॅकस ही अशी पद्धत आहे की तो गणिताचा क्लास नाही.तो कोणताही शाळेतील विषय नाही.परंतु मुलांमध्ये एकाग्रता व अभ्यासातला गोडवा वाढविण्याच्या दृष्टीने वेदिक मॅथ्स हा एक उत्तम पर्याय आहे.
                 अबॅकस म्हणजे शालेय वर्ग नव्हे तर अब्याकस म्हणजे थोडक्यात मन्याची पाटी होय. त्या पाठीच्या उजव्या बाजूकडील अंक हे बेरीज व वजाबाकी साठी मनी वापरले जातात व डाव्या बाजूकडील अंक गुणाकार भागाकार यासाठी वापरला जातो.मुलांचा सध्याचा अभ्यास पाहिला तर वर्गमध्ये जेवढे आहे.तेवढे पाठांतर करून घेऊन रेग्युलर अभ्यास पूर्ण करून मुलांना चांगले मार्क मिळतात.परंतु चौबाजूनी मुलांचा विकास होणे शक्य नाही. म्हणून अबॅकस किंवा वेदिक मॅथ्स ही पद्धत मुलांमध्ये अवलंबावी.सहा ते चौदा वयोगटातील मुलांना या पद्धतीत सहभागी होण्यास भाग पाडावे.म्हणजे त्यांचा चहूबाजूंनी विकास होणे शक्य होय.
               आपण कोणत्याही प्रकारचा डोक्याचा भाग न वापरता कितीही मोठी आकडेमोड कॅल्क्युलेटर द्वारे काही मिनिटांमध्ये करत असतो. परंतु अबॅकस ही एक अशी पद्धत आहे की त्यामध्ये कितीही मोठा गुणाकार,भागाकार,बेरीज किंवा वजाबाकी मुलं पटकन करतात हे अबॅकसमुळे शक्य आहे.या पद्धतीचे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल मुलांनी पालकांना करून दाखवले.गणित अंकाची बेरीज किंवा वजाबाकी ही आकडेमोड पालकांनी मोबाईल मधील कॅल्क्युलेटर वर केली परंतु त्या अगोदर मुलांनी पटकन उत्तरे दिली. त्यामुळे मुलांच्या बौद्धिक वाढ व विकास क्षमता किती आहे.हे थोडक्यात पालकांना या ठिकाणी दिसून आले.या स्पर्धेच्या युगात अबँकस मुळे मुले आपले व्हिज्युअलायझेशन,आपली पावर कशा पद्धतीने वापरायची ही टेक्निक यामध्ये दिसून येते.

चौकट

वयाच्या सहा वर्षापासून अबँकस मुलांना शिकविले पाहिजे.जेणेकरून भविष्यात मुलांच्या अभ्यासात व  व्यवहारात त्यांना बरीच मदत होते. मुलांच्या  बुद्धीचा विकास होतो .    
                               प्राचार्य
                    हरिश्चंद्र पांडुरंग गाडेकर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा