Breaking

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन जनावरांचा मृत्यू




मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन जनावरांचा मृत्यू 




महाड-प्रतिनिधी 
मुंबई- गोवा महामार्गावर एका अज्ञात वाहनाने तीन पाळीव जनावरांना धडक दिल्याने या अपघातात तीनही पाळीव जनावरांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना गुरुवारी रात्री इसाने कांबळे गावाजवळील रस्त्यावर घडली. 
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इसाने कांबळे गावाजवळ गुरुवारी रात्री अतिवेगाने जाणाऱ्या अवजड वाहनाने तीन पाळीव जनावरांना धडक दिल्याने या पाळीव जनावरांचा मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याची इतर वाहन चालाकानाही रस्त्यावर घडलेल्या अपघाताचा अंदाज न आल्याने या पाळीव जानावरांच्या अंगावरून वाहने गेल्याने त्याच्या शरीराचे चिंधड्या उडाल्या होत्या तसेच संपूर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. हि पाळीव जनावरे सुहेल जुवले आणि इक्बाल जुवले यांची असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. या पाळीव जनावरांमध्ये तीन गाई आणि एका वासराचा समावेश आहे. या अपघातामुळे या दोन शेतकऱ्यांच नुकसान झाले असून या अपघाताची चौकशी करावी अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा