सर्व सामान्या पर्यंत सेवा देणारी एस टी च्या कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण झालच पाहिजे . रास्ता रोको आंदोलनात नळदुर्ग शहर विकास आघाडीची शासनाला हाक .
प्रतिनिधी अजित चव्हाण नळदुर्ग
संपुर्ण महाराष्ट्रात एस टी महा मंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण झालच पाहिजे हा हा सर्व सामान्यांचा संघर्ष आहे . खरेतर सर्व सामान्या मानसाना उत्कृष्ठ सेवा देणारी बस सेवाच आहे. गाव तिथे एस टी जाणार
गरीबातला गरीब आसला किंवा
श्रीमंतातला श्रीमंत आसुदया याना तात्काळ सेवा देणारी बसच आहे . अंध अपंग जेष्ठ नागरिक जेष्ठ पत्रकार आदीना सेवा देणारी बसच आहे म्हणूनच या एस टी महामंडळाचे शासकीय विलीनी करण झालंच पाहिजे यासाठी नळदुर्ग शहर विकास आघाडी व नळदुर्ग शहरातील गावकऱ्यांच्या
वतीने एस टी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण झाले पाहिजे हा मुद्दा घेऊन नळदुर्ग शहरात गावकऱ्यांचा वतीने सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक संजय बताले यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढुन राष्ट्रीय हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . यामध्ये नळदुर्ग शहर पत्रकार संघ व मैलारपूर कट्टा ,भाजपा मिडीया सेलचे सुशांत भुमकर, पद्माकर घोडके रिपाइं चे जिल्हा सचिव एस के गायकवाड , महाराष्ट्र नवनिर्माण सेना , ज्योतिबा येडगे , महाराष्ट्र मुस्लीम फ्रन्ट सामाजिक संघटना , अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मलन संघर्ष समिती नळदुर्ग शहर यांच्या वतीने या अंदोलनाला पाठींबा देण्यात आला यावेळी भाजपाचे सुशांत भुमकर , नगरसेवक महालिंग स्वामी रिपाइंचे एस के गायकवाड , शरद देशमुख , पद्माकर घोडके पत्रकार तानाजी जाधव , धिमाजी घुगे श्रमीक पोतदार , सामाजिक कार्यकर्ते खय्यूम कुरेशी , संजय बेले , रवि सुरवसे अदिसह सामाजिक कार्यकर्ते ,संघटनेचे कार्यकर्ते विविध पक्षाचे कार्यकर्ते अंदोलनात शेकडो कार्यकर्त्यानी सहभाग नोंदविला . यावेळी नळदुर्ग चे मंडल अधिकारी जयंत गायकवाड यांना मागणीचे निवेदन देण्यात आले . नळदुर्ग ठाण्याचे सपोनि जगदीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स पो उपनिरीक्षक सरपाळे जीवीशाचे
वाघमारे पोलीस हेड कॉन्स्टेबल गौतम शिंदे सह अनेक पोलिसांचा
चोख बंदोबस्त ठेवला होता .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा