Breaking

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

राज्यातील महीला सहकारी संस्थांना बंदिस्त शेळी - मेंढी पालनासाठी निधी मंजूर ... अरुण काळे



राज्यातील महीला सहकारी संस्थांना बंदिस्त शेळी - मेंढी पालनासाठी निधी मंजूर ... अरुण काळे


,पहील्यांदा च एवढया मोठ्या प्रमाणात निधी मंजूर  

   पिलीव प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्माच्या महीला सहकारी संस्थांना राज्य सहकारी विकास निधीतून प्रत्येक महीला सहकारी संस्थेला पन्नास लाख रुपये अनुदान व एक कोटी ते तिन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज बंदिस्त शेळी मेंढी पालनासाठी अनुदान व कर्ज मंजूर केले असल्याचे  अहील्यादेवी सहकारी संस्थेचे संयोजक अरुण काळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाराष्ट्र राज्याचे सहकार खात्याचे राज्य मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातुन राज्यातील महीलांना सबलीकरण व सक्षम करण्यासाठी महीलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विशेषतः धनगर समाज्यातील महीला हया शेळी - मेंढी पालनासाठी आपले गाव,घरदार सोडून बाहेरच्या गावात काळया रानात वणवण भटकंती करीत शेळया - मेंढयांचे पालन करतात .ऊन,वारा,पाऊस असताना ही त्रास सहन करीत महीलांना अत्यंत त्रास सहन करीत शेळ्या मेंढयांचे पालन करावे लागते. या समाजातील महीलांना आपल्या गावातच उदयोग करता यावा यासाठी बंदिस्त शेळी मेंढी पालन योजना मंजूर व्हावी यासाठी माजी आ अनील गोटे, अरुण काळे,व त्यांचे सर्व सहकारी संस्था मधील सहकारी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. याला यश आले असुन राज्यातील सुमारे पाचशे महीलांच्या सहकारी संस्थांना 1000 ते 1500 कोटी रुपयांचे अनुदान व कर्ज मिळणार असल्याचे अरुण काळे यांनी सांगितले. सदरचा सहकार विकास निधी मंजूर केलेबददल सहकार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अरुण काळे,नारायण सुळे,गजानन जानकर, हैदर केंगार,मुकुंद बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते. सहकार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्यातील महीलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.       फोटो - राज्याचे सहकार मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कार करताना अरुण काळे,नारायण सुळे व इतर मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा