Breaking

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवानिमित्त,तुळजापूर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न, यात ८१ बहाद्दरांनी केले रक्तदान.....*



*देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवानिमित्त,तुळजापूर येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न, यात ८१ बहाद्दरांनी केले रक्तदान.....*




देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवस निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर च्या वतीने रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्री तुळजाभवानी देवींची पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभो यासाठी महारती करण्यात आली. 


 नंतर रक्तदान शिबीर उदघाटन अध्यक्ष श्री प्रा.विलासनाना जगदाळे,अध्यक्ष.श्री तुळजाभवानी ट्रस्ट तुळजापूर खुर्द,बाबुरावतात्या माळी रामेश्वरअप्पा नन्नवरे,चंद्रकांतभाऊ देशमाने,धनराज मार्डे,शिवाजी साबळे,गौतम जगदाळे,यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात  आले. शिबिरात संजय देशमाने यांचे 32 वे रक्तदान होते त्यामुळं त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रक्तदात्यांना आयोजक यांच्या वतीने भेटवस्तू म्हणून भिंतीवरील घड्याळ सस्नेह भेट देण्यात आले. या रक्तदान शिबिरात 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले,शिबिरास शहराध्यक्ष अमर चोपदार, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरास तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, गोकुळ शिंदे, माजी नगरसेवक धनंजय पाटील,माजी नगरसेवक श्रीकृष्ण सूर्यवंशी,कार्याध्यक्ष गोरख पवार,तोफीक शेख जिल्हा कार्याध्यक्ष अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष फेरोज पठाण,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळूंखे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष रोहित चव्हाण, कार्यध्यक्ष आरिफ बागवान, शहराध्यक्ष वाहेद शेख, तालुक संघटक बबन गावडे, युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी,राष्ट्रवादी विद्यार्थी शहराध्यक्ष आदित्य शेटे, हेडगेवार रक्तपेढी संचालक श्री.महेंद्र कावरे सर,विद्यार्थी काँग्रेसचे युवा नेते अभिजित कदम,काँग्रेस विद्यार्थी तालुका अध्यक्ष विराज जगदाळे आदींनी भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष मकसूद शेख, अमीर शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालूका कार्याध्यक्ष शरद जगदाळे,गणेश नन्नवरे, अभिजित लोले, विजय नन्नवरे,ओम जगदाळेसोमनाथ भोजने, शिवराज जगदाळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश नन्नवरे यांनी तर आभार मक्सद शेख यांनी मानले. यावेळी सोलापूर ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा