Breaking

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

*मा.पोलीस अधीक्षक श्रीम निवा जैन यांच्यासोबत म.रा.दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा उस्मानाबाद यांची बैठक संपन्न*



*मा.पोलीस अधीक्षक श्रीम निवा जैन यांच्यासोबत म.रा.दिव्यांग कर्मचारी संघटना शाखा उस्मानाबाद यांची बैठक संपन्न*


दिव्यांग व्यक्ती, कर्मचारी व पोलीस अंमलदार यासाठी संपन्न झालेल्या सदरील बैठकीत खालील विषयावर सकारात्मक बैठक झाली. १९९६ पासून पदाची परिगणना करुन पदोन्नतीचा अनुशेष भरणे, दिव्यांग कर्मचारी,पोलीस अंमलदार यांची स्वतंत्र सेवाजेष्ठता यादी तयार करणे, दिव्यांग पोलीस अंमलदार यांना शारिरीक क्षमतेनुसार  काम देणे दिव्यांग कर्मचारी पोलीस अंमलदार यांना सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणे पुरविणे, दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम२०१६ या कायद्याची अंमलबजावणी करणे, दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी व दिव्यांग पोलीस मित्राची नियुक्ती करणे, पोलीस अधिक्षक कार्यालय व पोलीस स्टेशन दिव्यांग स्नेही बनविणे व इतर विषयावर सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकिस जिल्हाध्यक्ष तथा राज्य समन्वयक श्री महादेव शिंदे, श्री बप्पासाहेब ढवळे, दत्तू दंडगुले, भारत देवगुडे, दत्ताजी सातपुते, बापु कांबळे,आशा कांबळे,रामेश्वर जाधव,राजू यादव,अतुल पांचाळ उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा