Breaking

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा रास्ता रोकोचा इशारा



एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा रास्ता रोकोचा इशारा

प्रतिनिधी

एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी महामंडळाचे कर्मचारी बेमुदत संपावर असून राज्य शासनाने कर्मचाऱ्यांची मागणी येत्या दोन दिवसात मान्य न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने  रास्ता रोको .करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी कुर्डूवाडी येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देताना दिला. संभाजी ब्रिगेडच्या वतीने कुर्डूवाडी आगार प्रवेशद्वार येथे सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सक्रिय सहभाग घेत पाठिंबा दिला.यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना जगताप म्हणाले,  कोरोना संकटकाळात देखील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवाश्यांना सेवा दिली. तेच कर्मचारी राज्य शासनाच्या विरोधी धोरणांना कंटाळून स्वतःचे जीवन संपवत आहेत. आंदोलन दडपण्यासाठी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत तसेच निलंबित करण्यात येत आहे.पुरोगामी महाराष्ट्रात हे थांबले पाहिजे व कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. राज्य शासनाने लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांचा मागणीचा विचार करून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. अन्यथा या कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुढील आठवड्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा संघटक विजयकुमार परबत,  तालुकाध्यक्ष बालाजी जगताप, उपाध्यक्ष रणजित देशमुख, कामगार आघाडी अध्यक्ष अजय गायकवाड, पिंपळनेर गट प्रमुख अभय पाटील, चिंचगाव ग्रामपंचायत सदस्य शंकर उबाळे, कुर्डू शाखा अध्यक्ष बाळासाहेब भोसले, बाळासाहेब जगताप, सागर गोडसे यांच्यासह  महामंडळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळ --एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंब्याचे पत्र देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, विजयकुमार परबत, बालाजी जगताप, अजय गायकवाड व इतर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा