Breaking

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

जनतेने ग्रामसेवकावर विश्वास ठेवू नये' ...आ. संजय शिरसाट यांचे अवमानकारक वक्तव्य ...**आमदारांनी माफी मागावी ...तात्यासाहेब पाटील राज्यात ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू....*



*'जनतेने ग्रामसेवकावर विश्वास ठेवू नये' ...आ. संजय शिरसाट यांचे अवमानकारक वक्तव्य ...*

*आमदारांनी माफी मागावी ...तात्यासाहेब पाटील राज्यात ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू....*


बेंबळे। प्रतिनिधी... / मुकुंद रामदासी   AJ 24Taas News Network                

  राज्यामध्ये एकूण २३ हजार ३६८ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. शासनाच्या ग्राम विकासाच्या अनेक विविध विकास योजना ग्रामपंचायत स्तरावर यशस्वीपणे राबविणारा हा शासनाचा महत्त्वाचा कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे,परंतु ८ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे महिला सरपंच परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये आमदार संजय शिरसाट यांनी "ग्रामसेवकावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये" असे अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे ग्रामसेवकांची जनमानसात प्रतिमा मलीन  झाली असून त्यांच्या वक्तव्याचा राज्यातील ग्रामसेवकांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. आमदार संजय शिरसाट हे राज्यातील ग्रामसेवकांची जोपर्यंत जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत  ग्रामसेवक असहकार आंदोलन करतील असे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तथा नुतन राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांनी  निवेदनाद्वारे नामदार मुख्यमंत्री यांचेसह सर्व संबंधितांना कळवले आहे. या बंद आंदोलनामुळे ग्रामीण जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीस संपूर्णपणे आमदार संजय शिरसाट हे जबाबदार असतील असे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाने मुख्यमंत्र्यांना  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
        हिवरेबाजार, पाटोदा यासारखी राज्यातील असंख्य गावे ग्रामसेवकांच्या पारदर्शक, आदर्श कामाची साक्ष देतात. राज्यातील हागणदारीमुक्त गाव करण्यामध्ये  ग्रामसेवकांचा मोठा वाटा असल्याची जाणीव आमदार महोदयांना असावी असे  निवेदनात म्हटले आहे.आमदार संजय शिरसाट यांच्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध म्हणून मंगळवारी ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरू केले तर १० नोव्हेंबर पासून आमदार संजय शिरसाट ग्रामसेवक संवर्गाची जाहीर माफी मागेपर्यंत ग्रामसेवक असहकार आंदोलन करतील असे  मुख्यमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

चौकट ......
           ग्रामसेवक संघाने,मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात आ.शिरसाट यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्यांनी जाहीर माफी मागून,आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. ग्रामसेवकांवर विश्वास ठेऊ नका असे म्हटल्याने आता ग्रामीण भागातील कामे कशी होणार असा सवाल ही तात्यासाहेब पाटील यांनी उपस्थित केला आहे.
 
फोटो ओळ..... श्री तात्यासाहेब पाटील ,जिल्हाध्यक्ष तथा राज्याध्यक्ष ग्रामसेवक संघ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा