उजनी धरणातून भीमा नदीत ५ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यास सुरुवात...।पाण्याच्या वीसर्गात वाढ होण्याची शक्यता। ...
अधिक्षक अभियंताधीरज साळे
वीर मधून नीरा नदीत ४५०० क्युसेक्स पाणी सोडले .....
संगम पासून पुढे भीमा नदीला पूरस्थिती....
नागरिकांना सतर्कतेचा इशारा...
बेंबळे ।प्रतिनिधी
उजनी धरणात सध्या 108 टक्के पाणी पातळी तयार होऊन 121 टीएमसी पाणीसाठा तयार झालेला आहे व विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे दौंड येथून भीमा नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग सतत वाढत असल्यामुळे रात्री आठ वाजता 8800 क्युसेक्स पर्यंत दौंड येथील विसर्ग गेलेला आहे. नियोजित 111.23 % टक्के पाणीपातळी उजनी धरणात कायम ठेवण्यासाठी फक्त 3 टक्के पाणीसाठा आवश्यक असून आगामी एक ते दोन दिवसात तो पूर्ण होण्याच्या मार्गावर निश्चित आहे. या सर्व सद्यपरिस्थिती मुळे धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री 9 वा. पासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात 5000 क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यास प्रारंभ झालेला आहे. दौंड येथून धरणात कमी-जास्त येणाऱ्या पाण्याच्या विसर्गचा विचार करून सध्याच्या 5000 क्युसेक्स विसर्गात मध्यरात्री किंवा 10 ऑक्टोबर च्या सकाळपर्यंत केव्हाही वाढ होण्याची शक्यता आहे असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी कळवले असून धरण नियंत्रण विभाग सद्यस्थितीवर कटाक्षाने लक्ष देत आहे.
नीरा खोऱ्यातील स्तिथी....
दरम्यान सध्या नीरा खोऱ्यातील गुंजवणी, देवधर, भाटघर व वीर ही धरणे 100% भरलेले असून ओव्हर फ्लो होऊ लागलेली आहेत .त्यामुळे 9 ऑक्टोबरला सकाळपासून वीर धरणातून नीरा नदीत 4500 विसर्गाने पाणी सोडण्यात आले आहे असे नियंत्रण विभाग प्रमुख जयंत भांडवलकर यांनी कळवले आहे. हे पाणी आठ ते दहा तासानंतर नरसिंगपूर येथे संगमा पासून भीमा नदीस मिळते. त्यामुळे नऊ ऑक्टोबर च्या मध्यरात्रीपासून किंवा दहा ऑक्टोबरला सकाळपर्यंत भीमा नदीत एकूण नऊ हजार पाचशे ते दहा हजार क्युसेक्स विसर्गाने संगम पासून पुढे पाणी प्रवाही असणार आहे., यामध्ये नियोजनानुसार वाढ होण्याची शक्यता आहे, म्हणून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आलेला आहे.
उजनी धरणाची 9ऑक्टोबर रात्री नऊची स्थिती...
पाणी पातळी 497. 221मीटर
एकूण साठा 3446 .11 दशलक्ष घन मीटर
121. 68 टीएमसी
उपयुक्त साठा 1643. 30 दशलक्ष घनमीटर
58.12 टी एम सी
टक्केवारी 108. 31 टक्के
दौंड येथून भीमा नदीतून उजनी धरणात येणारा विसर्ग.......
8800 क्युसेक्स
धरणातून विसर्ग .....
भीमा नदी 5000 क्युसेक्स
सीना माढा सिंचन योजना...185 क्युसेक्स
दहिगाव.... 63 क्युसेक्स


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा