Breaking

शनिवार, ९ ऑक्टोबर, २०२१

निबंध स्पर्धेत परिते केंद्रातील जयश्री कोष्टी व शरद गवळी यांचे यश*




*निबंध स्पर्धेत परिते केंद्रातील जयश्री कोष्टी व शरद गवळी यांचे यश* 


एस बी शिंदे निमगाव टे----AJ 24 Taas News Maharashtra

*माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी यांच्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. कोरोनाच्या कारणाने दुर्लक्षित झालेल्या विषयाकडे पुन्हा लक्ष देणे व एकंदरीत गुणवत्ता वाढविणे आवश्यक आहे. या माध्यमातून शैक्षणिक दर्जा सुधारला जाईल. यासाठी नवकल्पना व योजना शोधण्यासाठी व शिक्षकांच्या विचारांना चालना देण्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.*
  *माढा तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत शिक्षकांमधून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा परिते येथील शिक्षिका श्रीमती जयश्री बाबुराव कोष्टी यांचा तृतीय क्रमांक आला. तसेच मुख्याध्यापक निबंध स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरिनगर चे मुख्याध्यापक श्री शरद चंद्रहार गवळी यांचाही तृतीय क्रमांक आला. वरील दोन्ही शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन. 
   *निबंध स्पर्धेत क्रमांक मिळविल्याबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारीसाहेब, गटशिक्षणाधिकारीसाहेब यांनी शिक्षकांचे अभिनंदन केले.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा