राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चिमुकल्या विराज चव्हाणने पटकावला द्वितीय क्रमांक
माढा येथील आर्या पब्लिक स्कूलमधील पहिलीचा विद्यार्थी
माढा / प्रतिनिधी - बीड जिल्ह्यातील रुद्रेश्वर अर्बन निधी लि.पाडळसिंगी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत माढा येथील आर्या पब्लिक स्कूलमधील पहिलीचा विद्यार्थी विराज अमित चव्हाण याने द्वितीय क्रमांक पटकावला असून त्यास समारंभपूर्वक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र आणि रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
विराज चव्हाण याने "छत्रपती शिवाजी महाराज एक विचार" या विषयावर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि प्रभावीपणे सुंदर विचार मांडले होते त्याची दखल घेऊन संयोजकांनी त्यास सन्मानित केले आहे.विराजने यापूर्वीही छत्रपती संभाजी महाराज, आमदार संजयमामा शिंदे यांच्याविषयी भाषणे केली आहेत. कमी वयात विराजचे धाडस, बोलण्याची शैली व सभाधीटपणा वाखाणण्याजोगा आहे त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी बँकेचे चेअरमन नितीन जगताप, व्हा.चेअरमन गोविंद साबळे, शिवव्याख्याते ज्ञानदेव काशीद, नवनाथ जाधव, प्रा.जाधव सर, प्रगतशील शेतकरी सचिन बोबडे, सिमा बोबडे, वडील अमित चव्हाण,आई अबोली चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी आणि बँकेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
विराजच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे अभिनंदन आमदार बबनदादा शिंदे,आमदार संजयमामा शिंदे,जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे,शाळा व्यवस्थापच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, विस्ताराधिकारी बंडू शिंदे,सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड प्राचार्य सागर थोरात,संभाजी पाटील,विलास चव्हाण,अशोक चव्हाण,कुबेर पाटील, तानाजी अनभुले,रामचंद्र चव्हाण, नागेश कुनाळे,नागेश देशमुख,माधव बुरुंगे,प्रशांत पाटील,राजवर्धन गुंड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.
फोटो ओळी- माढा येथील आर्या पब्लिक स्कूलमधील विराज चव्हाण स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्रासमवेत बाजूला इतर विद्यार्थी आणि मान्यवर.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा