Breaking

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

घरफोडीड्या फोडया करणारा अट्टल गुन्हेगार अटक.... आरोपी कडून ४७,५०० रु. किंमतीचा मुद्देमालपोलिसांनी केला जप्त…


घरफोडीड्या फोडया करणारा अट्टल गुन्हेगार अटक....

 आरोपी कडून ४७,५०० रु. किंमतीचा मुद्देमालपोलिसांनी केला जप्त… 
 


 श्रीगोंदा:

सविस्तर असे की १४ जुलै २०२१ रोजी प्रकाश अर्जुन चव्हाण रा.कोसेगव्हाण ता.श्रीगोंदा यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली की, १३ जुलै २०२१ रोजी सायं ५:३० च्या सुमारास घराच्या दरवाज्याला कुलुप लावुन, शेतात कामासाठी गेलेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे बंद घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन, घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरुन नेले. या फिर्यादीवरुन  पोलीस स्टेशनला भा.द.वि ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर २२ ऑगस्ट २१ रोजी सपोनि. दिलीप तेजनकर सो. यांना गुप्त माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी राजु अर्जुन काळे रा.घाणेगाव ता.पारनेर याने त्याचे साथीदारासह ही चोरी केल्याचे समजले. तो घाणेगाव ता.पारनेर शिवारात असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी- कर्मचारी यांनी घाणेगाव ता.पारनेर शिवारात कोबिंग ऑपरेशन राबवुन, रेकॉर्डवरील अट्टल आरोपी राजु आजगन उर्फ अर्जुन काळे वय ३५ वर्षे, रा.घाणेगाव ता.पारनेर यांस ताब्यात घेवुन, विचारपुस केली असता, त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारा च्या मदतीने केला असल्याचे कबुल केले असुन, सदर गुन्ह्यातील चोरीला गेलेले सोन्याचे दागिने राहते घरातुन घाणेगाव ता.पारनेर येथुन काढुन दिले आहे.

त्याचेकडुन पॅशन प्रो हीरो कंपनीची मोटारसायकल काढुन दिली. ती त्याने राजगुरुनगर ता.खेड जि.पुणे येथुन चोरी करुन आणल्याची कबुली दिली आहे. त्याबाबत खेड पोलीस स्टेशनला माहीती घेतली असता, पुणे ग्रामिण खेड पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर आरोपी कडुन १७,५००/- रु.किंमतीचे सोन्याचे दागिने व ३०,०००/- रु.किंमतीची एक पॅशन प्रो हीरो मोटार सायकल असा एकुण ४७,५००/ – रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीकडुन आणखी गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता पोलिसाना होतेय .

गुन्ह्याचा तपास पोहेकॉ गावडे हे करीत आहेत.आरोपी वर  नारायणगाव पोलीस स्टेशन, खेड पोलीस स्टेशन, श्रीगोंदा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रा मध्ये बरेच गुन्हे दाखल आहेत.

सदरची कार्यवाही ही
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षकरामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष(सपोनि) दिलीप तेजनकर, (सहा.पो.उप.नि.)अंकुश ढवळे, पोहेकॉ मनोहर गावडे,पो.ना इंगवले,पो.कॉ प्रकाश मांडगे, किरण बोराडे,दादासाहेब टाके, अमोल कोतकर, विनायक जाधव यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा