Breaking

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

आरोग्य विभाग ( PHC माकणी) लोहारा यांच्या अंतर्गत तोरंबा उपकेंद्राच्या माध्यमातून हराळी येथे लसीकरणास उत्तम प्रतिसाद.*



*आरोग्य विभाग ( PHC माकणी) लोहारा यांच्या अंतर्गत तोरंबा उपकेंद्राच्या माध्यमातून हराळी येथे लसीकरणास उत्तम प्रतिसाद.*



     दिनांक- 08.09.2021 रोजी ग्रामपंचायत कार्यलय हराळी येथे 18 वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. याआधी गावात जनजागृती करुन ग्रामस्थांनी लस घ्यावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. याचाच परिणाम म्हणून युवक व महिलांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. हराळी येथे झालेल्या या उपक्रमात 180 ग्रामस्थांनी लसीचा डोस घेतला. यासाठी डॉ. संतोष मनाळे ( समुदाय आरोग्य अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली हराळी गावाचे उपसरपंच रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन सुर्यवंशी, भैय्या धाडवे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, किसन सुर्यवंशी, गप्पू पाटील, अमित रनखांब, सुजित सुर्यवंशी, ज्ञानेश्वर जाधव, अंगद सुर्यवंशी, सूरज सुर्यवंशी, मनोज पाटील आदी युवकांनी परिश्रम घेतले. यावेळी तहसीलदार साहेब यांनी भेट दिली व मार्गदर्शन केले.


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा