Breaking

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांची धानोरे देवी गावाला सदिच्छा भेटकृषी,कोरोना व आरोग्यासह अन्य विषयांवर चर्चा करून केले मार्गदर्शन



जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांची धानोरे देवी गावाला सदिच्छा भेट


कृषी,कोरोना व आरोग्यासह अन्य विषयांवर चर्चा करून केले मार्गदर्शन


माढा / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील मानेगाव गटाचे अभ्यासू नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांनी धानोरे देवी गावाला सदिच्छा भेट देऊन नेतेमंडळी व ग्रामस्थांसमवेत कृषी,कोरोना, जलसिंचन,आरोग्य व आहार आणि रस्त्यासंदर्भात सुमारे दोन ते अडीच तास दिलखुलास गप्पागोष्टी करीत सविस्तर चर्चा करून उपयुक्त मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे जागेवरूनच विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून काही प्रश्र्नांचा निपटारा केल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी रणजितसिंह शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका उपाध्यक्ष तानाजी बळीराम देशमुख व कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना जि.प. सदस्य रणजितसिंह शिंदे म्हणाले की,सध्या कोरोनाची संख्या कमी झाली असली तरी प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि शासनाच्या आदेशांचे पालन करावे,शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून ऊस व डाळिंब,द्राक्ष आदी फळबागांचे संगोपन करावे,‌बाजारपेठेत मालाला योग्य भाव नसेल तर गोडावून मध्ये साठवून ठेवावा, प्रत्येकाने आहारात सेंद्रिय पद्धतीने वाढविलेल्या पालेभाज्या व फळे यांचा समावेश करावा आणि दररोज व्यायाम करावा तसेच भरपूर शुद्ध पाणी प्यावे,या भागातील जलसिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार बबनदादा शिंदे यांच्यामार्फत शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.या भागातील विविध रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून भरीव निधी मंजूर केला आहे भविष्यात उरलेली कामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक निळकंठ पाटील,संदिप पाटील,जेष्ठ नेते लक्ष्मण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख,कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख,माजी सरपंच औदुंबर देशमुख,राजेंद्र खोत,नेताजी कापसे, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,बाबासाहेब पारडे,सुनील गुंड,पप्पू जगताप,शुभम देशमुख,प्रकाश कुलकर्णी,सुरज देशमुख,बालाजी यादव,सचिन पाटील,कृष्णा वाघ,संतोष कांबळे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

फोटो ओळी- धानोरे ता.माढा येथे जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांचा सत्कार करताना राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष तानाजी देशमुख,कृषी पर्यवेक्षक अनिल देशमुख व इतर मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा