मातंग समाजावर होणारा अन्याय रोकावा - विजय (सर) क्षिररसागर
तुळजापूर : प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील तालुका कंधार येथील गउळ या गावी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करून पुतळा काढण्यात आला व सदर ठिकाणी वास्तव्यास असलेल्या मातंग समाजाच्या सर्व माणसांना अमाणूस मारहाण पोलिस प्रशासनाने केली यामुळे या ठिकानचे पोलीस प्रशासन व डी वाय एस पी कांबळे यांना सेवेतून बडतर्फ करावे व याचा मोरक्या असलेला येथील जातीवादी गावगुंड माजी जिल्हा परिषद सदस्यबाबुराव पाटील गिरे यांच्यासह सदर ठिकाणच्या पोलीस प्रशासनावर ॲट्रॉसिटी अंतर्गत व मारहाण केली बाबत कठोर कारवाई करावी
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील बोरगाव गावातील काही सवर्ण लोकांनीएका मातंग समाजाच्या मयत व्यक्तीची अंत्ययात्रा काढून दिली नाही व नाईलाज असतो ग्रामपंचायत च्या समोर अंत्यविधी करावा लागला सदर दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी
तुळजापूर तालुक्यातील येवती गावात एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग अत्याचार करण्यात आला याचा निषेध व्यक्त करताना मातंग समाजाच्या नऊ व्यक्तीवर गुन्हे खोटे दाखल करण्यात आले सदर गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे
तुळजापूर तालुक्यातील लोहारा येथील सास्तूर येथे एका मातंग समाजाच्या युवकाला विद्युत पोलवर ग्रामपंचायतीच्या वतीने चडवीण्यास भाग पाडले व सदर युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला त्या संदर्भात दोषी व्यक्ती जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई तात्काळ करण्यात यावी
उस्मानाबाद जिल्ह्यातील गोवर्धन वाडी येथे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावलेले बॅनर काही मनुवादी व्यक्तीने काढून मशानात फेकून दिले यांच्यावर कठोर कारवाई तात्काळ करण्यात यावी,
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील रहिवासी असलेले मातंग समाजातील युवकाचा भरदिवसा तुळजापूर येथील जुने बस स्थानक येथे खून करण्यात आला सदर गुन्हेगारास फाशीची शिक्षा देण्यात यावी,
अंबाजोगाई येथे मातंग समाजाच्या महिलेवर अतिप्रसंग करण्यात आला अशा दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा अनेक अत्याचार मातंग समाजावर इतर समाजकंटक गाव गुंड त्यांना पाठीशी घालणारे राजकीय व्यक्ती व पोलीस प्रशासन करत आहेत,
आमच्या मागण्या न मान्य झाल्यास जिल्हा नांदेड तालुका कंधार येथील गऊळ या गावी मातंग समाजाची अस्मिता साहित्यरत्न लोकशाहीत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा येत्या आठ दिवसात सन्मानाने न बसवीआल्यास लवकरच लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सेना स्टाईलने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल त्याचे सर्वस्व जिम्मेदार प्रशासनाची राहील अशा घोषणा देत जवळपास रास्ता रोको दिड तास चाले त्या वेळी नायब तहसिलदार अमित भारती व पोलिस प्रशासनाच्या वतीने Api सुशिल चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सन्माननीय महिला प्रदेश अध्यक्ष, नागिना ताई कांबळे,, जिल्हा अध्यक्ष, शिवाजी गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष मा,विजय क्षिरसागर, कोरकमिटी, जिल्हा अध्यक्ष, बालाजी भाऊ गायकवाड,पंचायत समिती सभापती, शिवाजी गायकवाड, लक्षण भाऊ क्षिरसागर,जिल्हा कोष्य अध्यक्ष संभाजी भाऊ अध्यक्ष तालुका अध्यक्ष,कोंडलीक भोवळ, तालुका कोष्य अध्यक्ष, रामजी गायकवाड, गुणवंत क्षिरसागर,सतेवन पारधे,, व लहूजी महिला जिल्हा अध्यक्ष, सरीकताई कांबळे,सर्व अशोक जाधव नगरसेवक किशोर साठे,सागर पारधे,सुरेश भिषे किसन देडे, आदि उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा