Breaking

गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१

वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी दिलिपभाऊ आडे



वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी दिलिपभाऊ आडे

उस्मानाबाद दि.1 सप्टेंबर ( प्रतिनिधी)
वंचित बहुजन युवा उस्मानाबाद जिल्हा  कार्यकारणी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मान्यतेने व युवा आघाडीचे  प्रदेशाध्यक्ष मा . निलेश विश्वकर्मा यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झाली असून उस्मानाबाद जिल्हा युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी दिलिपभाऊ आडे यांची निवड झाली . त्यानिमित्त  वंचित बहुजन आघाडी च्या महिला जिल्हाध्यक्षा एडवोकेट जिनत प्रधान, जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव , जिल्हा प्रवक्ते एडवोकेट के .ट. गायकवाड, विद्यानंद वाघमारे ,  जागृती फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विजय बनसोडे , सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब कांबळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन / सत्कार केला .
या सत्काराला उत्तर देताना दिलिप भाऊ म्हणाले की, ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे  त्याला सार्थ ठरवत उस्मानाबाद जिल्ह्यात विविध जाती समुहातील युवकांना एकत्र करून जिल्हयात युवा आघाडी भक्कम करून झंझावात निर्माण करेण . तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अँड. जिनत प्रधान आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की, महिला आघाडी आपल्या सोबत राहिल व संपूर्ण ताकतीने आपणास सहकार्य करेल . त्याबरोबरच जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव यांनी युवा आघाडीस संपूर्ण सहकार्य व खांदयाला खांदा लावून पुढिल काळात  वंचित काम करण्याची ग्वाही दिली .
शेवटी विद्यानंद वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले .
 

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा