विजयसिंह मोहिते- पाटील यांची बेंबळे गावी भेट...।
.... विविध अडचणीविषयी नागरिकांशी चर्चा...
....स्व.सुहास भोसले यांनाआदरांजलीः...कुटुंबियांचे सांत्वन
बेंबळे।प्रतिनिधी। तीन फोटो
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते-पाटील यांनी बेंबळे ता.माढा या गावी भेट देऊन ग्रामस्थाबरोबर चर्चा केली., यावेळी ग्रामस्थांच्या मार्फत यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यानंतर हरीनगर येथे भाजपा नेते पोपटतात्या अनपट यांचे घरी जाऊन, नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू पावलेले सोलापूर जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त स्वर्गीय सुहास भोसले- अनपट यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व भोसले कुटुंबीयांचे सांत्वन केले.
वृत्तांत असा की माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व बेंबळकर नागरिकांचे मागील दोन पिढ्या पासूनचे घनिष्ठ संबंध आहेत. गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर च्या नियोजित दौर्यात त्यांनी बेंबळे गावी भेट देऊन रस्ते, वीज, पाणी, बंधारा दुरुस्ती, उसाचे क्षेत्र व इतर सामान्य जनतेच्या मूलभूत गरजा व अडचणी विषयी ग्रामस्थांशी मनमोकळी चर्चा केली व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून आपल्या अडचणी निश्चित सोडविल्या जातील, आपण सर्वानी सतत संपर्कात राहावे असे सांगण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच विजय पवार यांचे हस्ते आदरणीय विजयदादा यांचा फेटा, पुष्पहार व श्रीफळ देऊन ह्रद्य सत्कार करण्यात आला. माजी सरपंच कैलास भोसले, उपसरपंच नाना भोसले, प्राध्यापक औदुंबर लोंढे ,सिद्धेश्वर शिंदे, सोसायटीचे चेअरमन हनुमंत अनपट, संभाजी चोरमल, ग्रामपंचायत सदस्य दीपक किर्ते, दादा काळे, नामदेव कांबळे, अशोक देवकर ,अतुल पवार आदी प्रमुख मंडळी यावेळी उपस्थित होते.
यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी हरीनगर (बेंबळे) येथील पोपटतात्या अनपट यांच्या घरी जाऊन दीवंगत पोलीस उपायुक्त कै. सुहास भोसले-अनपट यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भोसले-अनपट कुटुंबीयांचे सांत्वन केले. पोलीस उपनिरीक्षक कै.सुहास भोसले -अनपट यांनी कांही वर्षे माळशिरस तालुक्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्य केले होते, याचाही विजयदादांनी आवर्जून उल्लेख करून त्यांच्या प्रामाणिक, धाडसी व सचोटीने काम करण्याच्या वृत्तीचा या प्रसंगी गौरव केला. यावेळी शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे, पोपटतात्या अनपट, समाधान अनपट, सरपंच विजय पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा