महादेव पवार यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई- पुरस्काराने गौरव
टेंभुर्णी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मधील उपक्रमशील शिक्षक महादेव इंद्रजीत पवार यांचा मुक्ताईनगर (जळगाव) मधील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन यांच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ई-पुरस्काराने सन्मान करण्यात आला. औरंगाबाद येथील उपजिल्हाधिकारी सौ. अंजली धारुरकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्काराचे वितरण झाले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या पुरस्कारामुळे शिक्षकांना आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते असे उपजिल्हाधिकारी सौ धानोरकर म्हणाल्या. हा पुरस्कार मिळाल्यामुळे महादेव पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील, रयतच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच परमेश्वर मामा देशमुख, रमेश नाना येवले पाटील, वसंतराव तात्या येवले पाटील प्रशालेचे मुख्याध्यापक देवेंद्र गोंजारे पर्यवेक्षक महादेव भुजबळ तसेच सर्व शिक्षक, सेवक यांनी त्यांचे अभिनंदन केले. या अगोदर जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार, मनुष्य विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षण रत्न पुरस्कार, आणि पंधरावे ग्रामीण साहित्य संमेलन खैराव यांच्या वतीने शैक्षणिक आणि सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
फोटो ओळी आयडेंटी फोटो : महादेव पवार


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा