Breaking

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

छायाचित्रण स्पर्धेत ग्रामीण भागातुन बेंबळेच्या प्रथमेश शिंदेची उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणुन निवड.........



*▶️  छायाचित्रण स्पर्धेत ग्रामीण भागातुन बेंबळेच्या प्रथमेश शिंदेची उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणुन निवड........
.
       

 ....... 'एस् न्युज मराठीचा' उपक्रम.....
                                                             

बेंबळे । प्रतिनिधी।                

         १९ आँगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून सर्वत्र मानला जातो.  या निमित्त एस्.न्युज मराठी या न्युज चँनेल च्या वतीने फोटोग्राफी ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शहर व जिल्ह्यातुन १९७ फोटोग्राफरनी आपली छायाचित्रे  स्पर्धेत पाठवली होती..यात सोलापुर शहरातुन विशेष सहभाग नोंदविला होता.या १९७ छायाचित्रातुन सर्वोत्कृष्ट पाच छायाचित्रांना विशेष पुरस्कार देऊन अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.,यावेळी फोटोनिरिक्षक-परीक्षक म्हणुन महेश बनसोडे हे उपस्थित होते.या स्पर्धा परीक्षेत संतोष धाकपाडे, चेतन लिगाडे, प्रमोद महिंद्रकर, प्रवीण गायकवाड व ग्रामीण भागातून बेंबळेच्या प्रथमेश शिंदे या पाचजणांच्या विशेष फोटोंची  निवड करण्यात आली व त्यांना सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक  अतुल झेंडे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले व त्यांचा गौरवही करण्यात आला.
चौकट...
 यावेळी ग्रामीण भागातून फोटोग्राफित सहभाग घेतलेल्या बेंबळे येथील प्रथमेश शिंदे याच्या फोटो चे विशेष कौतुक करण्यात आले. प्रथमेश शिंदे हा बेंबळे येथील दैनिक पुढारीचे पत्रकार सिद्धेश्वर शिंदे यांचा सुपुत्र आहे, त्याला लहानपणापासूनच फोटोग्राफीची आवड आहे.
                   परीक्षक म्हणून  महेश वसंत बनसोडे हे होते.ही स्पर्धा  एस् मराठी न्युज चँनलच्या वतीने 'फोटोग्राफी स्पर्धा २०२१' म्हणून आयोजित केली होती.

                यावेळी संपादक शिवाजी सुरवसे  ,.विजय आवटे,गिरिश गोरे, अभिषेक उघडे,अमोल पाटील,अनिकेत पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

                             प्रथमेश शिंदे याच्या फोटोग्राफीचा जिल्हास्तरावर गौरव झाल्याबद्दल बेंबळेचे सरपंच विजय पवार,शिवसेनेचे संजय बाबा कोकाटे,माजी सरपंच कैलास भोसले,ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी,प्रा.औदुंबर लोंढे, संतोष शिंदे,प्रा.मोहन भोसले,प्रा.कोळेकर,सज्जन अवताडे, यानी विशेष कौतुक केले. लहान वयात मिळवलेल्या यशाबद्दल प्रथमेश शिंदे याचे वर अभिनंदनाचा वर्ष होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा