*सोलापूर जिल्हा रयत क्रांती संघटनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचे वाटप*
टेंभूर्णी प्रतिनिधि/ सोलापूर जिल्हा रयत क्रांती संघटनेतर्फे कोल्हापूर जिह्यातील पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले. हा मदत वाटपाचा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील घोटवडेपैकी लव्हटेवाडी येथे पार पडला. संघटनेतर्फे प्रत्येक पूरग्रस्ताला मदत कीटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सोलापूर जिल्हा रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात,सोलापूर जिल्हा रयत क्रांती संघटनेचे सरचिटणीस राजकुमार सरडे, रयत क्रांती संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रा. एन. डी. चौगुले सर, , वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष शेळके, जिल्हा उपाध्यक्ष बोबडे सर, मोहोळ तालुका अध्यक्ष हनुमंत गिरी, तालुका संघटक प्रदीप कदम, रयत क्रांती संघटनेचे पन्हाळा तालुकाध्यक्ष विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा