*राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी*
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून ते वेस्ट-नॉर्थ वेस्ट दिशेने सरकण्याची शक्यता आहे.यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे असे हवामान विभागाने सांगितले.
✅ *कशी असणार पुढील स्थिती*
☑️ *आज 11 सप्टेंबरला*
👉रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून - पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे
☑️ **12 सप्टेंबरला*
👉रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट दिला आहे तसेच पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
☑️ *13 सप्टेंबरला*
👉पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी, हिंगोली, नंदूरबार, भंडारा आणि गडचिरोलीला यलो अलर्ट दिला आहे
☑️ *14 सप्टेंबरला*
👉पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे - तसेच मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली
👉तसेच नंदूरबार, जळगाव, धुळे, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे असे हवामान विभागाने सांगितले.
====================


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा