Breaking

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

शेवरे येथील कालव्यामध्ये सापडला अज्ञात पुरुषाचा खून करूनमृतदेह हात-पाय बांधून टाकलेल्या अवस्थेत माढा तालुक्यात खळबळ*



*शेवरे येथील कालव्यामध्ये सापडला अज्ञात पुरुषाचा खून करूनमृतदेह हात-पाय बांधून टाकलेल्या अवस्थेत माढा तालुक्यात खळबळ*



टेंभुर्णी प्रतिनिधी
शेवरे तालुका माढा हद्दीतील उजनी मुख्य कालव्यामध्ये  40 ते 45 वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडे मिळालेली सविस्तर माहिती अशी की शेवरे येथील उजनी मुख्य कालव्यामध्ये 40 ते 45 वय व पाच  ते साडेपाच फूट उंची असणाऱ्या अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला असून. त्याच्या शरीरावर  काळ्या रंगाची फूल पॅन्ट व पिवळ्या रंगाचा शर्ट असून गळ्याभोवती चॉकलेटी रंगाचा मफलर आवळण्यात आला होता, तसेच मृतदेहाचे दोन्ही हात-पाय कापडाने बांधून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हा मृतदेह शेवरे हद्दीतील उजनी मुख्य कालव्यामध्ये टाकून देण्यात आला होता  याबाबत शेवरे गावचे पोलीस पाटील सिद्धेश्वर गोरख मस्के वय 65 यांनी अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दिली असून सदर घटनेचा अधिक तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत आहेत.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा