*तुळजाई नगरीत एका रात्रीत बांधले 40 श्रींच्या मूर्तीला फेटे ,सारंग कावरे यांना महराष्ट्रासह इतर राज्यात फेटे बांधण्यासाठी मागणी
*
तुळजापूर - महाराष्ट्राची शान असणारा फेटा एक स्टाईल स्टेटमेंट आहे. आजही महाराष्ट्रीयन लोकांच या फेट्यावर तेवढंच प्रेम आहे जेवढ राजा-महाराजांच्या काळात होतं.फेटा म्हणजे मराठ्यांची (मराठी माणसांची) ओळख. अभिमान आणि प्रतिष्ठा अन संस्कृतीच प्रतीक समजलं जातं.आताच्या पिढीसाठी तो ऐतिहासिक पारंपारिक वेशभूषेचा भाग म्हणून नाही तर फॅशन स्टेटमेंट झालंय.आता हे एक दायित्व नसून ट्रेंड बनलाय. त्यामुळे आता या सध्या-सुध्या दिसणाऱ्या फेट्याला फॅशनेबल लूक मिळाला आहे.
तुळजाई नगरीतील सारंग वसंतराव कावरे हा तरुण वेगवेगळ्या पद्धतीने पारंपरिक व सेलिब्रिटी फेटे बांधण्यासाठी ओळखला जातो, सारंग आपल्या कलेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतो, कलाविष्कार डान्स अकादमीचा मुख्य संचालक आहे,राज्यभर त्याने अनेक पारितोषिके पटकावले आहेतच पण देशातील अनेक राज्यात देखील संस्कृतीक उपक्रमात सहभाग नोंदवला आहे,आता तो श्री गणेश फेटेवाला म्हणून आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करतो आहे.
श्री गणेश चतुर्थीच्या आगमनाची तयारी विविध प्रकारे करतात त्याच प्रमाणे गेले काही वर्ष श्रींच्या मूर्तींना विविध प्रकारचे फेटे बांधून घेतात, श्री तुळजाभवानी मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीला सारंग त्यांनी फेटा बांधला आहे. तसेच तूळजाई नगरीत यंदा श्रींच्या मूर्तींना एका रात्रीमध्ये 40 हून अधिक फेटे बांधले आहेत, त्यांची पत्नी सौ पूजा सारंग कावरे यांनीही तेवढीच साथ दिली आहे. या वर्षी 300 हून अधिक फेटे बांधले,आपल्या कलागुणांने विविध प्रकारचे फेटे बांधून आश्चर्यचकित केले.
सांस्कृतिक कार्यक्रम असो वा लग्न समारंभ, सत्कार असो वावाढदिवस, फोटोशूट असो वा यात्रा महोत्सव सारंग कावरे यांना व त्यांच्या फेट्याला मागणी असतेच,उस्मानाबाद,औरंगाबाद,जालना,लातूर,पुणे,मुंबई, नाशिक, हैदराबाद आदी ठिकाणी सातत्याने सागर फेटे बांधण्यासाठी जात असतो. याकामी त्याला त्याचे मित्र किशोर कसबे,नागेश इंगळे, निशिकांत खंदारे,ऋषिकेश गवळी आदी मदत सहकार्य करतात.
चौकट
फेट्याची लांबी ही तशी ३.५ ते ६ मीटर पर्यंत असते आणि रुंदी १ मीटर एवढी असते. यात तुम्ही तुमच्या आवडीने किंवा प्रसंगानुसार रंग निवडू शकता. पण जसजसा काळ बदलतोय तसतशी या फेट्याची स्टाईल देखील बदलत चालली आहे.फेटा बांधणे ही एक कला आहे,पण एक व्यवसाय म्हणून याकडे पाहिले जाते,माझ्याकडे स्वतःचे फेटा कलेक्शन आहे त्यामुळे विविध सण,उत्सवात, प्रोग्राममध्ये मागणीनुसार मी फेटा बांधून देत आहे.फेट्यासह नाविन्यपूर्ण आकाश कंदील,कृष्णटोप आदीं बनवत आपले कलागुण जोपासतो आहे.
सारंग कावरे (तुळजापूर)
श्री गणेश फेटेवाला.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा