*टेंभुर्णीत बँक ऑफ इंडिया च्या एटीएमची सुरक्षा रामभरोसे वाऱ्याव
टेंभुर्णी /प्रतिनिधी
सध्या टेंभुर्णी शहरात वेगवेगळ्या बँकांच्या शाखा असून लोकसंख्येची आकडेवारी पाहता बहुतांशी बँकांनी शहरांमध्ये आपल्या एटीएमचे जाळे विणले असून. अनेक बँकांचे एटीएम शहरांमध्ये असले तरी या एटीएमला सोयीसुविधा देण्यात मात्र बहुतांशी बॅंकांचे दुर्लक्ष असून बँकांच्या हलगर्जीपणामुळे टेंभुर्णी तील ATM मात्र कधी-कधी ग्राहकांची डोकेदुखी बनत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्याचाच प्रत्यय नुकताच टेंभुर्णी करांनी अनुभवला आला आहे टेंभुर्णीच्या मुख्य बाजारपेठेतील पुणे सोलापूर महामार्गवरील मच्छी मार्केट येथील बँक ऑफ इंडियाच्या ATM मध्ये केरकचरा व कागदांच्या ढिगाऱ्यावर तसेच मावा गोवा खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसून येत आहेत त्यामुळे या ATM मध्ये सुरक्षा रक्षक का ऐवजी कुत्र्यांनी आश्रय घेतलेला दिसून आला.जखमांनी जर्जर झालेल्या दुर्गंधीयुक्त कुत्र्यांमुळे एटीएम धारकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला असून एकीकडे कोरोना सारख्या महामारी च्या काळात बँक प्रशासन व कर्मचारी अनेक सुविधा ऑनलाईन व एटीएम च्या माध्यमातून देत असले तरी एटीएमची सुरक्षा मात्र वाऱ्यावर सोडली असल्याने एटीएम धारकांकडून संताप व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा