राज्यस्तरीय रक्षाबंधन विशेष स्पर्धेत रविना यादव प्रथम.
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
स्वयंसिद्धा महिला मंडळ लातूर यांची नऊ वर्षाची अखंड परंपरा असलेली राज्यस्तरीय रक्षाबंधन विशेष विविध स्पर्धेमध्ये कु.रविना आनंदकुमार यादव रा.वडूज ता .खटाव हिने एकूण ५५ स्पर्धकांना टक्कर देत सर्वप्रथम क्रमांक प्राप्त केला. याबद्दल स्वयंसिध्दा महिला मंडळ लातूर यांच्यावतीने सन्मानचिन्ह सन्मानपत्र व विशेष बक्षिस देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
रक्षाबंधन विशेष लेख या विषयावर रविना हिने सुलेखन केले. बहिण भावाच्या अतुट प्रेमाचे प्रतीक असलेला हा रक्षाबंधन सण व यातच वाढत जाणारा हा कोरोना, लॉकडाऊन, आणि त्याचे निर्बंध या मधून आपली व इतरांची काळजी घेत आपण कशा प्रकारे हा रक्षाबंधन सण साजरा करु शकतो यावर उत्तम प्रकारे लेखन करुन सविस्तरपणे आपल्या लेखनीतून मांडले. रविना ही वडूज मधील दादासाहेब जोतिराम गोडसे कला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात सध्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.
संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे (आण्णा), कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ.पाटील सर, उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, प्रा.डॉ.सविता गिरे, प्रा.डॉ.क्षितिज धुमाळ आदी प्राध्यापकांचे तिला मार्गदर्शन लाभले. तीच्या या यशाबद्दल कॉलेजच्या वतीने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तिचा गौरव करण्यात आला. रविना यादव ही वडूज आगारातील कर्तव्यदक्ष कर्मचारी, व कामगार सेनेचे जेष्ठ नेते आप्पासाहेब यादव यांची सुकन्या आहे. यापूर्वी रविना हिने अनेक राज्यस्तरीय बक्षिसे, साहित्य क्षेत्रात राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. रक्षाबंधन विशेष राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन रविना यादव हिने तालुक्याचे, महाविद्यालयाबरोबर पालंकांचीही मान उंचाविले असून वडूज परिसरातून तिचे कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा