*वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद जिल्हा टीमच्या वतीने राष्ट्रीय जनगणनेत ओबीसीची जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे या मागणी साठी जिल्हाधिकारी उस्तानाबाद कार्यालय समोर आंदोलन करून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले.*
उस्मानाबाद.
राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की,
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली 70 वर्षे ओबीसींच्या संघटना राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी करीत असून सरकार या मागणीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे .
ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या आधारेच अर्थसंकल्पीय तरतूद होऊ शकते. मात्र सातत्याने ओबीसी आरक्षणावर प्रश्न उपस्थित करून आरक्षण विरोधी शक्ती ते आरक्षण संपवण्याचा डाव खेळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचा एम्पीरिकल डेटा मागितला असून केंद्र सरकारने डेटा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे. ओबीसींचे सर्व क्षेत्रातील आरक्षण वाचवायचे असेल तर राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेतून निर्माण झालेला डेटा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याशिवाय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात सुटणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या भूमिकेचा फेरविचार केला पाहिजे. राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना केली पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करीत आहे. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा ईशारा आम्ही देत आहोत. या मागणीचे निवेदन सादर करतेवेळेस वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष बी.डी.शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा कार्यकारिणीचे सदस्य भैय्यासाहेब नागटिळे महिल जिल्हाध्यक्ष मा.एँड. जीनत प्रधान युवक जिल्हाध्यक्ष. दीपक आडे, जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव जिल्हा प्रवक्ते एँड.के.टी.गायकवाड जी.का.स.बालाजी शिंगे, मिलिंद रोकडे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
कुंदन वाघमारे,महिला उपाध्यक्ष मा.ज्योतीताई लोखंडे महिला जिल्हा संघटक अनुराधाताई लोखंडे,
जिल्हा कोषाध्यक्षा रुक्मिणीताई बनसोडे,जि का. सदस्या सुमन पायाळ, विकास बनसोडे,कळंब ता.अध्यक्ष राजाभाऊ मळगे,तालुका उपाध्यक्ष मा. कुंदन कांबळे,क.ता.स.सचिन गवळी,तुळजापूर तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल लष्करे .शेखर बनसोडे, शितल चव्हाण, अॅड रोहिदास तांदळे एँड.लक्ष्मण खुणे, एँड .संजय मोरे, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते अंदोलनास . मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा