टेंभुर्णी रोटरी क्लबच्या मोफत मधुमेह निदान शिबिराला उत्तम प्रतिसाद एकच दिवसात झाली 400 व्यक्तीची मधुमेह तपासणी
टेंभुर्णी ( प्रतिनिधी) टेंभुर्णी रोटरी क्लबच्या मार्फत करण्यात आलेल्या मोफत मधुमेह निदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. टेंभुर्णी शहरात विविध ठिकाणी तपासणी साठी मधुमेह तपासणी केंद्र तयार केले होते, या मध्ये पाटील हॉस्पिटल, डॉ पांडुरंग गायकवाड , डॉ अशोक जाधव, डॉ अमन सपाटे, डॉ. आनंद खडके यांचे क्लिनिक मध्ये सकाळी 9.वा पासुन चालु होते. मधुमेह तपासणीला उत्तम प्रतिसाद मिळाला एकाच दिवसात 400 व्यक्तीची मधुमेह तपासणी करण्यात आली. बर्याच व्यक्तिनी पहिल्यांदाच तपासणी केली त्यामध्ये अनेक व्यक्तिंना रक्तात साखरेचे प्रमाण वाढलेले आढळले अशांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. रोटरी इंडिया कडून संपूर्ण भारतात 'लढा मधुमेहाशी' या उपक्रमांतर्गत मधुमेह तपासणी अभियान एकाच दिवशी राबविण्यात आले होते एकाच दिवशी 10 लाख मधुमेह तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात होते ( वन नेशन वन मिलियन टेस्ट).त्याचाच एक भाग म्हणून सदर अभियान टेंभुर्णी मध्ये राबविण्यात आले सदर उपक्रम यशस्वी कारणासाठी सर्व रोटरी सदस्य व नवीन रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष व सचिव तसेच तरूण सदस्यांनी योगदान दिले. रोटरी क्लब चे अध्यक्ष नागेश कल्याणी व सचिव सुजित बेलपत्रे यानी सर्वाचे आभार व्यक्त केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा