Breaking

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

युवकांचे प्रेरणास्थान भारतीय जनता युवा मोर्चा दमदार जिल्हाध्यक्ष आदरणीय राजसिंहा (भैय्या) राजेनिंबाळकर*



*युवकांचे प्रेरणास्थान भारतीय जनता युवा मोर्चा दमदार जिल्हाध्यक्ष आदरणीय राजसिंहा (भैय्या) राजेनिंबाळकर*


 वर्षपूर्ती
मा. राजसिंहा भैय्या  11 सप्टेंबर 2021 रोजी आपल्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड होऊन 1 वर्ष झाले अर्थातच वर्षपूर्ती. आपण उच्चशिक्षण घेऊन राजकारणात अत्यंत कमी कालावधीत सक्रिय झालात आणि एक राणा दादांचा मावळा ते भाजपा युवा मोर्चा  जिल्हाध्यक्ष म्हणून नावलौकिक मिळविलात. ही तुम्हा-आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.  आमदार राणा जगजीतसिंह पाटील साहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकत जनसेवेचा वसा हाती घेतलात आणि आदरणीय राणादादांनी जनसामान्यांशी जोडलेली नाळ आपण तुटू दिली नाही. जनतेला काय पाहिजे, जनतेच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, हे आपण त्या लोकांमध्ये जाऊन जाणून घेतलात, जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याविरोधात आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दिलात, ही सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

"कोरोनाच्या काळात आपण जनतेच्या हाकेला धावून गेलात रुग्णांना बरोबर सेवामिळत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी आपण कशाचीही पर्वा न करता रुग्णांना प्रत्यक्ष जाऊन भेट दिली. अगदी कोरोना वार्डा मध्ये जाऊन जनतेच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेतलात, त्या विरोधात आवाज उठवला.
रेमडिसीवीर इंजेक्शन असो, ऑक्सिजन बेड असो, व्हॅटिलेटर बेड असो अथवा रुग्णांना आर्थिक आणि इतर कोणत्याही प्रकारची मदत असो आपण ती आपल्या पध्दतीने तेरणा मार्फत केलीय. यातून समाजाप्रती असलेला आपला भावनिक दृष्टिकोन दिसून येतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेला नेता म्हणून आपली ओळख निर्माण झाली आहे. 

आपण महाराष्ट्र प्रदेश वरील आलेलं कार्यक्रम पूर्ण ताकदीने प्रयत्न करून चांगल्या पद्धतीने राबवतात हे 21ऑगस्ट 2021 आपले भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थित युवा मेळावा जो की पूर्ण महाराष्ट्र भर गाजला हे आपल्या नेतृत्वाखाली दिसून आला,त्याच बरोबर महत्वपूर्ण विषयावरील वेळोवेळी प्रशासन ,जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सरकार विरोधात जोरदार आवाज उठवून आंदोलन केलं ,विरोधकांना अंगावर घेऊन पूर्ण ताकतीने पक्षाची बाजु मांडत आहात ,तसेच आपण 17 सप्टेंबर 2020 देशाचे पंत प्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह ,25 जून 2021 रोजी आणीबाणी बद्दल कार्यक्रम घेऊन जुन्या गोष्टींना,जेष्ठांच्या कार्याला उजाळा दिला,आपण स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक काम करणाऱ्या समाजसेवकांचा तसेच सामाजिक संस्थाचा गौरव केलात, कोविड च्या कठीण काळात रक्तदान शिबिर आयोजित केलात असे भरपूर महत्वपूर्ण उपक्रम आपण राबवत असतात. म्हणूनच

धाराशिव च्या राजकारणातील व समाजकारणातील एक प्रभावशाली नेतृत्व म्हणून आज आपल्याकडे पाहिले जात आहे. आपल्या कार्यपद्धत वर प्रभावीत होऊन धाराशिव शहरामध्येच नव्हे तर , धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात,गावात आपली लोकप्रियता, आपला चाहतावर्ग निर्माण झाला आहे, अनेक नवयुवक पक्षाशी जुडत आहे ,आत्मनिर्भर युवा या संकल्पने मुळे उद्योग शिलता तरुणांमध्ये वाढत आहे हिच आपल्या कामाची पावती आहे. भैय्यासाहेब आज आपल्याकडील पदाची वर्षपूर्ती झाली आहे तुमचे वर्ष भरातील समाजपयोगी कामे जनते समोर आहे तरी या मायेचा आधारवड ला पूढील कार्यभार ह्याच पद्धतीने राणाजगजितसिंह  दादा पाटील ,सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शन व नेतृतवाखाली जावा यासाठी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो.


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा