Breaking

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

सिद्धनाथच्या वडूज शाखेचा २० वा वर्धापन दिन साजरा


सिद्धनाथच्या वडूज शाखेचा २० वा वर्धापन दिन साजरा
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

दहिवडी येथील श्री सिद्धनाथ नागरी पतसंस्था वडूज शाखेचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन सुनिल पोळ, संचालक सुरेश जाधव, राजेंद्र देशमुख, दौलतराव बरकडे, आप्पासो गोडसे, सरव्यवस्थापक महादेव गोंजारी आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.  
          सातारा जिल्ह्यामध्ये २०० कोटीच्या पुढील ठेवी व १३०५७ सभासद संख्या असलेल्या श्री सिध्दनाथ नागरी पतसंस्थेला मोठया गटामध्ये राज्यात बँको ब्लू रिबन पुरस्कार २०२० द्वितीय क्रमांक प्राप्त केला असून वडूज शाखेच्या २० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक कै.वाघोजीराव पोळ काकांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सरव्यवस्थापक गोंजारी साहेब यांनी कोरोना काळातील संस्थेने केलेले मदतकार्य व संस्था अडचणीतून यशाच्या शिखरावर कशी पोहचली या विषयी संस्थेचा संपूर्ण कार्याचा आढावा सांगितला. यावेळी चेअरमन सुनिल पोळ म्हणाले, संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली असताना काही लोक विनाकारण संस्थेची बदनामी करीत असून आपण कोणीही याकडे लक्ष देऊ नये असे नमूद केले. श्री.बरकडे सर, आप्पासाहेब गोडसे यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली. कोरोनाकाळात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट पत्रकारिता केल्याबददल शरद कदम यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.
      कार्यक्रमास सर्जेराव गोडसे, समीर जगदाळे, उत्तम गोडसे, दत्तात्रय इंगवले, जगदीश गोडसे, बाळासाहेब गोडसे, अभिजीत गोडसे, भरत गोडसे, मानसिंग गोडसे, डॉ.विनोद चव्हाण, सुरेश कोळेकर, अरूण इंगवले, शरद साळुंखे, नितीन बर्गे, अश्विन बोटे, सुखदेव कदम, अभयकुमार देशमुख, रत्नाकर पवार, शिवाजी पवार, किशोर गोडसे, निलेश गोडसे आदि सह शाखेचे सर्व सभासद, ठेवीदार व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत देशमुख यांनी केले तर आभार शाखाप्रमुख रणजितसिंह देशमुख यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा