Breaking

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

माढा तालुक्यातील निर्बंध उठवावेत ......आ बबनराव शिंदे यांची मागणी*


*माढा तालुक्यातील निर्बंध उठवावेत 
      ......आ बबनराव शिंदे यांची मागणी*




बेंबळे। प्रतिनिधी :-
 माढा तालुक्यातील कोरोना विषाणूची साथ आटोक्यात आली असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसायावर लागू केलेले निर्बंध सणासुदी मुळे हटवण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून जिल्हाधिकारी यांनी मागणीस अनुकूलता दर्शवली असून प्रशासनास सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली
याबाबत अधिक माहिती देताना बबनराव शिंदे यांनी याबाबत सांगितले की मी आजच जिल्हाधिकारी डॉ मिलिंद शंभरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असून माढा तालुक्यातील कोरूना साथ आटोक्यात आली असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे तसेच सध्या सणासुदीचे दिवस असल्याने नागरिकांना खरेदी करण्यासाठी लाखो केलेले निर्बंधित तातडीने हवेत असे सांगितले आहे या मागणी विषयी जिल्हाधिकारी डॉ मिलिंद शंभरकर यांनी अनुकूलता दर्शवली असून यासंदर्भात प्रशासनास सूचना करण्याचे आश्वासन दिले आहे गेल्या अनेक महिन्यापासून कोरोना साथीच्या रोगांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण संख्या वाढल्याने करमाळा माढा माळशिरस पंढरपूर वर सांगोला सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सगळे दुकाने खुली ठेवण्याची परवानगी दिली होती या निर्बंधामुळे शेतकरी व्यापारी यांचे  प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे हेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असल्याने डॉ मिलिंद शंभरकर यांनी निर्बंध हटवण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे आता लवकरच करुणा साथीचे निर्बंध हटवण्यात येतील अशी माहिती बबनराव शिंदे यांनी दिली आहे तसेच सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून आपापली खरेदी केली पाहिजे असे आवाहन आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा