*चिखली( बु ) जिल्हा परिषद शाळेवर सतत शिक्षकांचा गैरहजर राहण्याचा प्रकार उघडकीस*
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
किनवट: जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिखली (बु) येथील सध्याच्या ५० टक्के उपस्थिती प्रमाणे पाच शिक्षक हजर राहणे आवश्यक असतांना फक्त दोन शिक्षक शाळेमध्ये उपस्थित राहत आहेत.याबद्दल गावकर्यांनी बऱ्याच वेळेस तक्रारी करूनही शिक्षक गैरहजर राहण्याचा प्रकार दिनांक ६ / ७ सप्टेंबर २०२१ रोजी उघडकीस आला असून,चिखली गावातील पालकांनी व शिवानंद गोविंदराव पवार यांनी शाळेवर भेट दिली.तेव्हा या शाळेमधील पाच पैकी दोन शिक्षक हजर होते.बाकी शिक्षक विनापरवानगी गैरहजर राहिले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.शिक्षक हजर नसल्याचे विचारपूस करत असतांना मुख्याध्यापक राजेश्वर जोशी यांनी पवार यांना तुमच्या ने काय होते ते करून घ्या अशी भाषा वापरली.
शाळा सुरू होऊनही कुणालाही सूचना न देता, परवानगी न घेता गैरहजर राहण्याचे प्राथमिक शिक्षकांचे धाडसच कसे होते,असा सवाल शालेय व्यवस्थाक समिती व गावकऱ्यांना पडला असून,विनापरवानगी गैरहजर राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याने पालकांनी शाळेतील शिक्षकांचा खुलासा केला.त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक राजेश्वर जोशी यांनी काही शिक्षक दोन दिवसापासून हजर नसल्याचे स्वतः कबूल करून लेखी पत्र लिहून पालकांना दिले.
यावर किनवट गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी काय कारवाई करतील याकडे तालुक्यातील पालकांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा