राजेवाडी येथील श्री श्री सदगुरु साखर कारखान्याचा 196 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
पिलीव प्रतिनिधी - राजेवाडी येथील श्री श्री सदगुरु साखर कारखान्याने 2020 -2021 या हंगामात गाळपासाठी आलेल्या उसाचा दुसरा हप्ता 196 रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांनच्या खात्यावर जमा केला असल्याचे कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरीराव व व्हा चेअरमन बाळासाहेब कर्णवर - पाटील यांनी सांगितले.
या अगोदर कारखान्याने शेतकऱ्यांना 2200 रुपये प्रमाणे पहीला हप्ता दिला होता .राहीलेला दुसरा हप्ता एफ आरपी प्रमाणे दिवाळीसाठी शेतकऱ्यांनच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. यामुळे आतापर्यंत सदगुरु साखर कारखान्याने शेतकऱ्यांना 2396 रुपये प्रति टन एवढा दर दिला आहे. तसेच दिवाळीसाठी कारखान्यामाफँत सभासदांना सध्या माफक दरात साखर वाटप सुरू असल्याचे कारखाना प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. सदगुरु साखर कारखाना नेहमीच सभासदांचे हित जोपासत चांगला दर त्याचबरोबर इतर विविध उपक्रम सतत राबवित असतो तसेच यापुढेही सभासदांना चांगला दर व इतर सुविधा पुरविण्यास कटीबद्ध असल्याचे चेअरमन एन शेषागिरीराव, व्हा चेअरमन बाळासाहेब कर्णवर - पाटील यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा