*भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते मराठवाडा विभागाच्या आणीबाणी अहवालाचे प्रकाशन.*
सन १९७५ ते ७७ च्या दरम्यान भारत देशात २१ महिने आणीबाणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. या आणीबाणीच्या काळात अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला होता. आणीबाणी विषयक माहिती तरुण वर्गाला व्हावी या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने एका ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात भारत देशातून विविध मान्यवरांनी सहभाग होता. यात मराठवाड्यातील देखील कार्यकर्त्यांचा सहभाग होता. भारतीय जनता पार्टीच्या वतीने या कार्यक्रमाचा आढावा नुकताच मुंबईत एका कार्यक्रमात घेण्यात आला होता. यात मराठवाडा विभागाच्या सर्व जिल्ह्याचे अहवालांचे प्रकाशन करण्यात आले . यावेळी मराठवाडा विभागाच्या अहवालाचे प्रकाशन कळंब तालुक्यातील नायगाव येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य कु. ललिता जाधव यांनी हा अहवाल सादर केला तसेच यासाठी सह संयोजक म्हणून हर्षवर्धन जी कराड व मनोज जी भारस्कर यांनी या मध्ये जबाबदारी पार पाडली . या अहवालाचे प्रकाशन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा