*तुळजापूर येथे शिक्षक दिनानिमित्त स्वर्गीय धन्यकुमार काका क्षिरसागर विचार मंचच्या वतीने शिक्षकांना सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला*
दि,५ सप्टेंबर २०२१,रोजी शिक्षक दिनानिमित्त स्व,धन्यकुमार काका क्षिरसागर विचार मंच च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विश्वासनगर,अयोध्या नगर भागातील शिक्षकांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान पत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. आपल्या व्यक्तीमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे,असे मत श्री दिनेश (अण्णा) क्षिरसागर, शहर संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुळजापूर यांनी व्यक्त केले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा