*बळीराम पाटील महाविद्यालयात* *शिक्षक दिन साजरा*
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
बळीराम पाटील महाविद्यालयात ५ सप्टेबर रोजी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने "शिक्षक दिन" म्हणून साजरा करण्यात आला. डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी शिक्षक पदापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदावर कार्य केले.हे सर्व शिक्षकांसाठी प्रेरणादायक आहे.संबंध जीवनभर त्यांनी इतिहास, दर्शनशास्त्र, तत्वज्ञान सारख्या जटील विषयावर इंग्रजीत लेखन केले.या विशाल कार्यामूळे भारत सरकारने 'भारतरत्न' देवून सन्मानीत केले. त्यांचा जन्मदिवस संबंध भारतभर शिक्षक दिवस म्हनुन साजरा केल्या जातो.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. शेषराव माने यांनी यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. या प्रसंगी सर्वप्रथम उपप्राचार्य डॉ जी.एस.वानखेडे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.उपस्थित पर्यवेक्षक प्रा .अनिल पाटील राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार डॉ.आनंद भालेराव प्रा.राजकुमार नेमानीवार, डॉ सुरेंद्र शिंदे कार्यक्रमाधिकारी कनिष्ट विभाग प्रा. पुरुषोत्तम येरडलावार महिला कार्यक्रमाधिकारी ,प्रा सुलोचना जाधव, प्रा पंजाब शेरे, प्रा ज्ञानेश्वर चाटे ,प्रा योगेश सोमवंशी, सुधीर पाटील आदी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा