डॉ. शंकररावजी चव्हाण शारदा धनवर्धिनी सहकारी पतपेढी नांदेडची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असणाऱ्या डॉ. शंकररावजी चव्हाण शारदा धनवर्धिनी सहकारी पतपेढीची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतपेढीचे अध्यक्ष प्रा. संतोष देवराये यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन संपन्न झाली. याप्रसंगी पतपेढीचे उपाध्यक्ष किशोरसिंह ठाकुर, सचिव गंगाधरराव जाधव, खजिनदार गजानन दरबस्तवार, संचालक विलास देवसरकर, संतोषराव मोरे, विलास शिंदे, प्रदीप भोसले, हिरामण साखरे, सौ मंजूषाताई कदम, सौ वैशालीताई देशमुख हे प्रत्यक्ष तर इतर सन्माननीय संचालक सभेसाठी ऑनलाईन उपस्थित होते.
प्रारंभी मराठवाड्याचे भाग्यविधाते,महाराष्ट्राचे आधुनिक भगीरथ श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण, शारदादेवी व माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पदाधिकारी व संचालक मंडळाने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पतपेढीचे अध्यक्ष संतोष देवराये यांनी प्रास्ताविकात पतपेढीच्या एकंदरीत प्रगतीचा आढावा घेत पतपेढीच्या वर्षभरातील विधायक निर्णयाची माहिती सभासदांना दिली. संस्थेचे सचिव श्री गंगाधरराव जाधव यांनी पतपेढीच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. याप्रसंगी पतपेढीच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीतून कु. वेदांती गंधपवाड, तर बारावीतून प्रसाद नारे यांचा रोख रक्कम व पुष्पहार देऊन पालकांसह त्यांना सन्मानित करण्यात आले.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या वार्षिक सभेत अनेक सभासदांनी उस्फुर्त सहभाग घेऊन सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. वार्षिक सभेच्या यशस्वीतेसाठी पतपेढीचे कर्मचारी श्री प्रकाश कोरके श्री अनिल गुबेर यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा